HW News Marathi
देश / विदेश

पीटीआयचे सत्ता स्थपानेसाठी १५८ इतके संख्याबळ

कराची | माजी क्रिकेटर इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षाला ३३ आरक्षित जागा मिळाल्या आहेत. या आरक्षित जागांमुळे इम्रान खान यांच्या पीटीआयचे संख्याबळ १५८ पर्यंत पोहोचले आहे. परंतु बहुमतासाठी अजून १४ जागांची आवश्यकता आहे.

इम्रान खान हे १८ ऑगस्टला पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहे. पीटीआयला मिळालेल्या एकूण ३३ आरक्षित जागांपैकी २८ महिलांना, तर ५ बिगर मुस्लीमांना मिळालेल्या आहेत. यानंतर पीटीआयचे संख्याबळ १५८पर्यंत येऊन पोहोचले आहे. तर इम्रान खान स्वत: पाच जागांवरून निवडून आले आहेत. या पाच जागांपैकी चार चागा त्यांना खाली कराव्या लागणार आहेत.

माजी पंतप्रधान मंत्री नवाझ शरीफ यांच्या पाकिस्तान मुस्लीम लीग पक्षाला १५ जागा मिळाल्या आहेत. त्याच्या पक्षाचे संख्याबळ ८२पर्यंत येऊन पोहोचले आहे. पाकिस्तानमध्ये २५ जुलैला २७० जागांसाठी मतदान झाले. या निवडणुकीत इम्रान खान यांच्या तेहरिक-ए-इन्साफ पक्षाला सर्वाधिक ११६ जागा मिळाल्या आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

पाकिस्तानच्या कुरघोड्यांमुळे जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय सैन्याला हाय अलर्ट

News Desk

पी व्ही सिंधू ‘सुवर्ण’ पदकाच्या शर्यतीतून बाद, भारताच्या पदरी निराशा!

News Desk

समाजवादी पक्षाच्या गृहकलहात तडजोड ?

News Desk
महाराष्ट्र

नारायण राणेंकडून नव्या राजकीय पक्षाची घोषणा

News Desk

मुंबई: ज्येष्ठे नेते नारायण राणे यांनी रविवारी नव्या पक्षाची घोषणा केली. महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष असे त्यांच्या नव्या पक्षाचे नाव असेल. देऊ शब्द तो पुरा करू असे पक्षाचे ब्रिदवाक्य असेल. लवकरच या पक्षाची नोंदणी केली जाणार असून माझे लक्ष्य सत्ताधारी नसून विरोधक असल्याचे सांगत त्यांनी भाजपला अप्रत्यक्ष सहकार्य करण्याचे संकेत दिले. दरम्यान, राणे यांनी या वेळी उद्धव ठाकरे यांचा समाचार घेतला. उद्धव यांनी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर बोलण्याचा कोणताही अधिकार नाही. सत्तेत राहायचे आणि टीकाही करायची, अशी दुहेरी भूमिका घेणे योग्य नसल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. दरक

मी सत्तेत असलो तर सत्ताधाºयासारखी भूमिका घेईन आणि विरोधात असलो तरी विरोधकाची भूमिका घेईन असे त्यांनी सांगितले. पदासाठी मी काम करतो असे काही नाही. काँग्रेसनेच मला मुख्यमंत्रीपदाचे आश्वासन दिले होते, अशी आठवण राणेंनी करून दिली. माझी मुख्यमंत्रीपदाची महत्त्वाकांक्षा अजूनही कायम आहे, असेही त्यांनी नमूद केले. माझी आक्रमकता जन्मजात असून ती कधीच जाणार नाही. पदासाठी मी तडजोड करणार नाही असे त्यांनी सांगितले.

Related posts

‘माझा मुलगा नगरपालिकेच्या शाळेत शिकतो’- बच्चू कडू

News Desk

‘वर्षा’वर आज तासभर खलबतं ! उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या बैठकीत नेमकं काय घडलं ?

News Desk

भाजपाच्या कार्यकारिणीत अजित पवारांच्या चौकशीच्या ठरावावरुन संजय राऊत संतापले, म्हणाले…

News Desk