HW News Marathi
देश / विदेश

राज्यसभेच्या उपसभापती पदासाठी ९ ऑगस्टला निवडणूक

नवी दिल्ली | राज्यसभेच्या उपसभापतीसाठी गुरुवारी ९ ऑगस्ट रोजी निवडणूक होणार आहे. पी. जे. कुरियन यांच्या पदाचा कार्यकाळ संपल्यानंतर राज्यसभेचे उपाध्यक्षपद रिक्त झाले आहे. उपसभापतीसाठी निवडणुका घेण्यात येणार आहे.

एनडीएने जेडीयूचे खासदार हरिवंश यांना उमेदवारी दिली आहे. हरिवंश हे बिहारमधील प्रभात प्रसिद्ध वृत्तपत्र प्रभात खबरचे संपादक राहिले आहेत. विरोधकांकडून अजून कोणत्याही उमेदवाराचे नाव दिले नाही. विरोधकांकडून तृणमूल काँग्रेसचा उमेदवार दिले जाणार असल्याचे म्हटले जाते.

राज्यसभेत कोणत्या पक्षाकडे किती जागा

एनडीएकडे ११५ खासदार असून त्यात भाजपचे ७३ जागा आहेत. यूपीएकडे एकूण ११३ जागा आहेत. यूपीएमध्ये काँग्रेसकडे ५० जागा असून हा सर्वात मोठा पक्ष आहे. राज्यसभेच्या उपसभापती पदी कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वाचे लक्ष लागेल आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गुगलकडून अनोखी मानवंदना, पहिल्या भारतीय महिला डॉक्टर आनंदीबाई जोशींचं डुडल

News Desk

राज्यपालांनी माझे म्हणणे स्वत:च्या मुलीप्रमाणे ऐकून घेतले | कंगना राणावत 

News Desk

मिशन किल किम जोनची तयारी पूर्ण 

News Desk