HW News Marathi
महाराष्ट्र

शेतकऱ्यांप्रमाणेच आम्हाला देखील आत्महत्या करावी लागेल

मुंबई | राज्यात प्लास्टिक आणि थर्माकोलवर बंदी लागू झाली आहे. यंदाच्या गणेशोत्सवापुरती थर्माकोल मखरावरील बंदी शिथिल करावी, ही मखरविक्रेते आणि ती तयार करणाऱ्या कलाकारांची विनंती उच्च न्यायालयाने फेटाळली.

माणसाच्या अंगी चिकाटी जिद्द असेल तर तो कशावरही विजय मिळवितो. माणसाचे पोट त्याला सर्व काही करायला शिकवते. फक्त माणसाकडे प्रयत्नांची पराकष्टा करण्याची इच्छा शक्ती हवी. कुर्ला येथील दिलीप दिघे हे जेमतेम सातवी शिकलेले. या शिक्षणाच्या जोरावर त्यांना नोकरी मिळणार नाही याची त्यांना खात्री होती. तरी त्यांनी जिद्द कायम ठेवली आणि छोटे-मोठे काम करत थर्माकोल पासून मखर तयार करण्याचा व्यवसाय सुरू केला. आज मखर निर्मिती हेच त्याचे उपजीविकेचे साधन आहे.

दिघे यांनी गणेशोत्सव हंगामात मखरे बनवायला सुरुवात केली प्रारंभी त्यांना त्रास झाला. पोटातील आग माणसाला कठोर परिश्रम करायला भाग पाडते. परंतु दिलीप दिघे यांनी आपल्या स्वभावानुसार हार न मानता कार्य पुढे सुरुच ठेवले. एकाचे दोन, दोनाचे चार असे करत दिघे यांनी उन्नती केली. परंतु राज्य सरकारने प्लास्टिक बंदीचा निर्णयाच्या पाठोपाठ थर्माकोल बंदी देखील लागू केली. यामध्ये दिलीप दिघे यांच्यासारख्या अनेक मखर बनवणाऱ्या कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे. व्यवसायावर त्याचा परिणाम झालेला आहे. गणेशोत्सवाच्या सजावटीसाठी लागणाऱ्या मखर विकण्यावर बंदी घातल्यामुळे कारखाना देखील बंद असल्याचे दिघे यांनी सांगितले. तसेच यावेळी जागेचे भाडे आत्तापर्यंत बनवलेल्या थर्माकोलची थकबाकी तसेच मखर बनविण्यासाठी घेतलेले कर्ज कसे फेडायचे असा प्रश्न दिघे यांना पडला आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी गणेशोत्सवात मखर विकले गेले नाहीत, तर शेतकऱ्यांप्रमाणेच आम्हाला देखील आत्महत्या करावी लागेल असे दिलीप दिघे यांनी सांगितले.

महाराष्ट्रात गणेशोत्सवातील सजावटीच्या मखरासाठी वापरले जाणारे थर्माकोल हे दहा टक्के आहे. तथापि, उरलेले ९० टक्के थर्माकोल हे टीव्ही, फ्रीज आदींच्या पॅकेजिंगसाठी वापरले जाते. सध्या प्राथमिक स्तरावर होणाऱ्या पॅकिंगमध्ये थर्माकोलला परवानगी आहे. ‘सरकारने बंदी लागू करण्याआधीच थर्माकोल खरेदी करून त्यापासून मखर व सजावटीचे साहित्य बनवण्यात आले होते. त्यामुळे त्यांची विक्री झाली नाही तर कलाकार व विक्रेत्यांचे मोठे नुकसान होईल. पर्यावरणांचे प्रदूषण होऊ नये यासाठी विकलेले मखर पुन्हा घेण्याची खबरदारी घेतली जाईल’, असे दिलीप दिघे यांनी एच. डब्लूशी बोलतांना सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उत्तर महाराष्ट्राचा दौरा अर्धवट, नाना पटोले तातडीने दिल्लीला रवाना होणार

News Desk

समीर वानखेडेंनी जातीचा दाखला जाहीर करावा – नवाब मलिक

News Desk

किरीट सोमय्यांचे तीन दिवसांत चार मोठे दौरे!

News Desk