HW News Marathi
मुंबई

थर्माकोल बंदीला तुर्तास स्थगिती

मुंबई |आजपासून मुंबईसह महाराष्ट्रात प्लास्टिक बंदीला सुरुवात झाली आहे. प्लास्टिक बंदीनंतर नक्की कोणत्या कोणत्या प्रकारच्या प्लास्टिकवर बंदी घालण्यात येणार या बाबत अनेकांच्या मनात शंका होती. मात्र महापालिकेने या बाबतचे नियम जाहिर केले आहेत. या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे प्लास्टिक बंदीच्या पहिल्याच दिवशी कडक कारवाईला सुरुवात झाली आहे.

मुंबईसह महाराष्ट्रात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्यामुळे बाप्पाच्या मुर्तीच्या सजावटीसाठी लागणा-या थर्माकोलच्या वस्तूंवर मात्र तुर्तास बंदी घालण्यात आलेले नाही. महाराष्ट्रात तरुण मोठ्या प्रमाणावर बाप्पाच्या सजावटीसाठी लागणा-या मखरांची निर्मिती करतात. त्यामुळे गणेशोत्सवाच्या दृष्टीने थर्माकोलवरची बंदी तुर्तास स्थगित करण्यात आली आहे.

प्लास्टिक बंदी संदर्भात शुक्रवारी मुंबईत मंत्रालयामध्ये झालेल्या मिटिंगमध्ये थर्माकोल पासून मखर गणपती सजावट बनविणा-या व्यापा-यांना आदित्य ठाकरे व पर्यावरण मंत्री रामदास कदम व प्रदेश अध्यक्ष वैभव वाघ प्रदेश कार्य अध्यक्ष सचिन जामगे यांच्या प्रयत्नांने थर्माकोल असोशिएशनला यंदाच्या मानाच्या गणेश उत्सवामध्ये थर्माकोलवरची तात्पुरती बंदी उठविल्याने दिलासा मिळाला आहे.

सरकारच्या या निर्णयामुळे करोडो रूपयांचा खर्च वाया जाणार होता तसेच हजारो मराठी तरूण रोजगाराला मुकणार होते. थर्माकोलवरची बंदी उठवून तुर्तास निर्णयाला स्थगिती देण्यात आल्यामुळे तरुणांमध्ये उत्साहाचे वातावरण पहायला मिळत आहे. थर्माकॉलचे मखर तयार करणा-या अनेक तरुणांनी या निर्णयाचे स्वागत केले असून सरकारचे तसेच महापालिकेचे आभार मानले आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

स्वातंत्र दिनी राणीच्या बागेत चिमुकल्याचे आगमन

swarit

लोणावळ्यात खासगी बस उलटून 26 प्रवासी जखमी, 5 गंभीर

News Desk

सुनील शितपचा तात्पुरत्या जामिनासाठी अर्ज

News Desk
राजकारण

कृषी क्षेत्रातला विकास पाहायला बारामतीला या

News Desk

बारामती | देशाचा विकास होण्यासाठी कृषी क्षेत्राचा विकास होणे गरजेचे आहे. कृषी क्षेत्रासह ग्रामीण विकास पाहायचा असेल तर संसदेतील प्रत्येक खासदाराने बारामतीला भेट द्यायला हवी, असे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी म्हटले आहे. सध्या नायडू हे बारामतीच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आहेत. विद्या प्रतिष्ठानमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. याप्रसंगी माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार, पालकमंत्री गिरीश बापट, खासदार सुप्रिया सुळे आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आदी मंडळी यावेळी उपस्थित होती.

ग्रामीण विकासाचे जे चित्र मी पाहिले होते, तसेच हुबेहुम चित्रे मला येथे पाहायला मिळाले. बारामती दौऱ्यामुळे मला प्रचंड आनंद झाला असल्याचे उपराष्ट्रपती यांनी म्हटले होते. अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचालित कृषी विज्ञान केंद्राचेही नायडू यांनी याचे कौतुक केले आहे. तसेच शेती क्षेत्रात काही समस्या आहेत. परंतु समस्यांचे समाधान आपण शोधले पाहिजे, असे देखील यावेळी व्यंकय्या नायडू यांनी सांगितले.

Related posts

सत्ता नसल्यामुळे सध्या पाण्याविना मासे अशी तुमची अवस्था

News Desk

शरद पवार हे भाजपच्या ट्रॅकमध्ये अडकले आहेत !

News Desk

INX Media Case : पी. चिंदबरम यांना ईडी अटक करू शकत नाही

News Desk