HW News Marathi
महाराष्ट्र

मराठी पाठपुस्तकात आता गुजराती ?

नागपूर | मराठी शाळेतील सहावी इयत्तेच्या भूगोल या विषयाच्या पुस्तकात दोन पाने गुजराती भाषेतील आढळून आली आहेत. यामुळे पावसाळी अधिवेशनात राज्यातील शिक्षण व्यवस्थेवर विरोधकांनी ताशेरे ओडले असून जोपर्यंत सरकार याबाबत खुलासा करणार नाही, तोपर्यंत विधानपरिषदेचे सुरू होई देणार नाही. यामुळे विधानपरिषदेचे कामकाज तहकूब झाले आहे.

मराठीत गुजरातीचा शिरकाव झाला काय, असा सवाल काँग्रेसचे आमदार भाई जगताप यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे. एका बाजूला भाजप सरकार मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी प्रयत्न करत आहे. तर दुसऱ्या बाजूला मराठी पाठ्यपुस्तकात गुजराती शिरकाव झाल्याचे चित्र दिसत आहे. राज्य सरकारचा हा भोंगळ कारभारमुळे विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात दिसत आहे. तसेच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी प्रसार माध्यमांना सहावी इयत्तेच्या भूगोला विषयाच्या पुस्तकातील गुजराती भाषेतील मजकुराबद्दल तीव्र निषेध व्यक्त केला आहे.

या पुस्तकात एकही शब्द आणि पान गुजरातीमध्ये नाही. बाइंडिंगवाल्यांनी ती चूक केली असल्याची शक्यता असल्याचे सांगताना चंद्रकांत पाटील यांनी गुजराती पाने असलेले पुस्तक आणि त्यातील पाने तुम्हीच जोडून आणली असल्याचा आरोप सुनील तटकरे यांनी केला. तसेच चंद्रकांत पाटील यांच्या आरोपाला उत्तर देताना तटकरे बोलत होते की, आयुष्यभर असे कधी गेले नाही, आम्ही छापून आणले असेल. तर याच मी याच सभागृहात विष घेऊन आत्महत्या असे सुनील तटकरे म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दूध पुरवठा सुरळीत राहणार | मुख्यमंत्री

News Desk

रंगभूमीवर बालनाट्य बंद आणि मंत्रालयात बालनाट्य सुरु – आशिष शेलार

News Desk

मोठी बातमी! १०वी-१२वीच्या परीक्षा पुढे ढकलल्या, वर्षा गायकवाडांची घोषणा 

News Desk