HW News Marathi
मुंबई

पोलीस वसाहतीत स्लॅब कोसळून एक महिला जखमी

मुंबई | वांद्रे पूर्व येथील गर्व्हमेन्ट कॉलनीमध्ये गुरुवारी सकाळी पहाटे ४.३० वाजताच्या सुमारास स्लॅब कोसळला. ही दुर्घटना बी-२९५५ या फ्लॅटामध्ये घडली असून येथे सावंत कुटुंबिय राहत आहेत. या दुर्घटनेत सावंत कुटुंबातील मुलगा नैतिक सावंत (९) आणि त्यांची आई वैशाली सावंत (३२) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. या दोघांवर भाभा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

काही दिवसांपूर्वी वरळीच्या पोलीस वसाहतीत स्लॅब कोसळून एक महिला जखमी झाली असून तिला नऊ टाके पडले होते. यानंतर आता आणखी एक घटना समोर आली. त्यामुळे गर्व्हमेन्ट कॉलनीची सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अर्नाळा बीचवर होळी साजरा करण्यास गेलेल्या ५ जणांचा बुडून दुर्दैवी मृत्यू

News Desk

ठाण्यात सेनेसमोर राष्ट्रवादीचं आव्हान

News Desk

सर्वच शेतकऱ्यांना कर्जमाफी – चंद्रकांत पाटील

News Desk