HW News Marathi
मुंबई

दक्षिण मुंबईत झाड कोसळल्याने वाहतूकीचा खोळंबा

मुंबई | पेडर रोड परीसरात सोमवारी पहाटे ३ च्या सुमार एक झाड पडल्याची घटना घडली. झाड आकाराने मोठे असल्यामुळे वाहतूकीचा खोळंबा झाला होता. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झालेली नाही. परंतु जीवित हानी झाली नसली तरी या परिसरात सकाळच्या वेळेत हजारो वाहनांची ये जा होत असते.

झाड पडल्यामुळे बराच वाहतूक खोळंबली होती. सदर घटना घडल्यानंतर घटनास्थळी पालिका कर्मचारी तसेच ट्रॅफिक पोलीस वाहतूक नियंत्रण करत आहेत. पण या घटनेत झाड बाबूलनाथ या बेस्ट बस थांब्यावर पडल्यामुळे बस थांबा उध्वस्त झाला आहे. बेस्ट बसस्टॉपचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. २० पालिका कर्मचारी झाड बाजूला करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

कर्नाटकातील राजकीय परिस्थितीवर येडियुरप्पा म्हणतात “वेट अँड वॉच”

News Desk

उच्च न्यायालयाची राजकीय पक्षांना नोटीस

Gauri Tilekar

अंधेरी स्टेशनजवळ पुलाचा काही भाग कोसळला, दोन जण जखमी

News Desk
मुंबई

कुर्ला रेल्वे स्थानकात आत्महात्येचा थरार, सीसीटीव्हीत कैद

swarit

मुंबई | कुर्ला रेल्वे स्थानकात धावत्या एक्सप्रेस समोर उडी मारुन एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली. वेगाने आलेल्या एक्सप्रेस मेल समोर कुर्ला रेल्वे स्थानकात तरुणाने उडी मारली. अंगाचा थरकाप उडवणारी ही घटना रेल्वे स्थानकातील सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

कुर्ल्याच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ५ वर प्रवासी लोकलची वाट पाहत होते. त्यावेळी एक्सप्रेस रेल्वे जाताना काही प्रवासी प्लॅटफॉर्मवरच मागे सरकले. त्याचवेळी एक्सप्रेस रेल्वे येण्याच्या काही क्षणापूर्वी एक तरुण रुळावर उडी मारतो. त्यानंतर वेगाने जाणारी रेल्वे त्याच्या अंगावरून जाते. हे अंगाचा थरकाप उडविणारे दृश्य सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहे.

तरुणाने अचानक उडी मारल्याने त्याचे प्राण कोणीही वाचवू शकले नाही. या प्रकाराने उपस्थित असलेल्या प्रवाशांना धक्का बसला. आरपीएफ जवानांनी मृताची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला. पण त्याची ओळख अद्याप पटली नाही. त्याचा मृतदेह सायन रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

Related posts

काळाघोडा फेस्टिव्हलवरील स्थगिती कायम

swarit

HW EXCLUSIVE : पोलीस भरतीत शक्तीवर्धक इंजेक्शनचा बोलबाला; मुंबईतील चाचणी डोपिंगच्या विळख्यात?

Chetan Kirdat

लोकायुक्तांकडे दररोज दाखल होतात 15 तक्रारी

News Desk