HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यात आजपासून प्लास्टिक बंदी, कारवाईला सुरुवात

मुंबई | आजपासून मुंबईसह महाराष्ट्रात प्लास्टिकबंदीच्या अंमलबजावणीला सुरुवात झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे. आज प्लास्टिक वापरणाऱ्यांवर कारवाई सुरु आहे. प्लास्टिक वापरणाऱ्याला पाच हजार रुपये दंडाची पावती दिली जात असून पुण्यात महापालिकेच्या पथकाकडून सकाळपासून 73 ठिकाणी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाई दरम्यान महापालिकेने तीन लाख 69 हजार रुपयांची वसुली केली.

दिवसभरात सांगलीमध्ये प्लास्टिकचा वापर करणा-या आणि प्लास्टिक साठा ठेवणा-या दुकानांवर महापालिकेने कारवाई केली आहे. प्लास्टिक आणि थर्माकोलचा साठा हस्तगत करून दंडात्मक करण्यात आली आहे. महापालिकेने आपल्या 15 भरारी पथकाच्या माध्यमातून आज जवळपास 50 हजार रुपये दंड वसूल केला, तर अंदाजे एक टन प्लास्टिक पिशवी आणि अन्य प्लास्टिक जप्त केल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

महाराष्ट्रात दिवसभरात झालेली कारवाई

  1. अकोला महानगरपालिका : तेलीपुरा चौकात प्लास्टिकविरोधात एक कारवाई, दुकान मालकाला तीन हजारांचा दंड .
  2. अहमदनगर महानगरपालिका : पाच वाजेपर्यंत शहरात फक्त दोघांवर कारवाई, दोघांकडून दहा हजारांचा दंड वसूल
  3. जळगाव महानगरपालिका : आज कारवाई नाही
  4. नांदेड-वाघाळा महानगरपालिका : महापालिकेच्या सहा पथकांमार्फत शहरात तपासणी, सकाळपासून चार कारवाया करत 20 हजारांचा दंड वसूल .
  5. नाशिक महानगरपालिका : 72 जणांवर कारवाई, 350 किलो प्लास्टिक जप्त, 3 लाख 60 हजार रुपयांचा दंड वसूल.
  6. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका : 4 दुकानांवर कारवाई करून 20 हजार दंड वसूल, 7 किलो प्लास्टिक जप्त
  7. पुणे महानगरपालिका : 73 जणांवर कारवाई, तीन लाख 69 हजार रुपयांचा दंड वसूल
  8. भिवंडी-निजामपूर महानगरपालिका : 40 हजार रुपयांचा दंड वसुल
  9. मालेगाव महानगरपालिका : आज कारवाई नाही
  10. सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका : 40 हजार रुपये दंड वसूल, अंदाजे एक टन प्लास्टिक पिशवी आणि अन्य प्लास्टिक जप्त

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

धक्कादायक! परळीत वृद्ध बहिण-भावाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या

News Desk

MIM सोबत जाण्याच्या निर्णयावर शरद पवार म्हणाले…

Aprna

मुख्यमंत्री गेंड्याच्या कातडीचे आहेत कारण यशोमती ठाकूरांनी जर… चंद्रकांत पाटील यांचा गंभीर आरोप

News Desk