HW News Marathi
देश / विदेश

देशभरात योगा दिन उत्साहात साजरा

मुंबई : आज संपूर्ण जगभरात चौथा आंतरराष्ट्रीय योगा दिन उत्साहात साजरा होत आहे. पेरिसच्या आयफिल टॉवरपासून ते मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये योगा दिन साजरा झाला आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तराखंडमधील देहरादूनमध्ये योगासने केली. तर राजस्थानच्या कोटामध्ये योगगुरू बाबा रामदेव आणि मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी देखील योगासने करुन वर्ल्ड रिकोर्ड बनविला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तराखंडच्या देहरादूनमध्ये योगा दिन साजरा केला आहे. देहरादून येथे वन संशोधन संस्थेतच्या वतीने योगा दिनानिमित्ताने मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५५ हजार जणांसह योगासने केली आहेत.

 

गेल्या ३० वर्षापासून भारतीय नौदलाची शक्तीस्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आयएनएस विराट युद्धनौकेवर नौदलाच्या जवानांनी योगासने केली. गेल्या वर्षी आयएनएस विराट सेवेतून निवृत्त झाली आहे. या युद्धनौकेवर योगा दिना निमित्ताने बहुसंख्या जवानांनी योगासने करुन आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा केला.

 

योग गुरू बाबा रामदेवा यांनी राजस्थानच्या कोटामध्ये २ लाख नागरिकांसोबत योगासने करुन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बनविला आहे. यावेळी राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी देखील त्यांच्यासोबत योगासने केली.

 

मुंबईची लाईफ लाईन म्हणून ओळखली जाणारी लोकल ट्रेनमध्ये देखील योगासने केली गेली. महिलांनी योगासाने करुन आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा केला.

Related posts

बँक लुटण्यासाठी खोदला दोन हजार फूट लांबीचा बोगदा

News Desk

राज्याच्या सत्तांतरावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू; कपिल सिब्बल यांचा युक्तीवाद

Aprna

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची ७५वी जयंती, दिग्गज नेत्यांनी वाहिली आदरांजली

News Desk