HW News Marathi
मनोरंजन

कपिल शर्मा आणि चाहते

प्रेक्षकांना खळखळून हसविणाऱ्या टीव्हीवरील प्रतिभावंतांमध्ये कपिल शर्मा हे प्रामुख्याने घेता येईल. कपील शर्मा त्याच्या चाहत्यांवर भरभरून प्रेम करतो. याचमुळे तो सोशल मीडियावरदेखील मोठ्या प्रमाणावर सक्रिय असतो. त्याच्या कार्यक्रमांनाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद असतो. त्यांच्याशी तो ट्विटर, इन्स्टाग्राम, फेसबुकवर संवाद साधत असतो.

गेल्या दोन महिन्यांपासून मात्र तो सोशल मीडियावर फारसा सक्रिय नाही. याचे कारण म्हणजे त्याच्या कार्यक्रमाचा प्रेक्षकवर्ग घसरला आहे. पत्रकारांना मानहानीकारक वागणूक दिल्याने त्याच्यावर बराच संताप व्यक्त झाला होता. सहकलाकार त्याला सोडून गेले. आधीच्या प्रेयसीशी त्याच्या झालेल्या वादाने त्याची मानसिकता अधिकच ढासळली.

काही दिवसांपूर्वी कपील पुन्हा प्रेक्षकांच्या समोर आला. मात्र त्याची अवस्था अनेकांना हळवी करणारी ठरली. कपिलकडे पाहून अनेक प्रेक्षकांनी त्यांच्या तब्येतीविषयी चिंता व्यक्त केली आहे. डोळ्याखाली काळी वर्तुळे, वाढलेलं वजन आणि आधीच त्याची ढासळलेली मानसिकता यावरून तो ‘स्थूलपणाचा’ शिकार झाला असल्याचे स्पष्ट आहे. माणसाला नैराश्य आले तर त्याचे जागरण वाढते, भूक नसतानाही खाण्याची सवय जडते. यामुळे नको असला तरी स्थूलपणा बळावतो. जो गंभीर आजारांना आमंत्रण देणारा ठरतो. हा स्थूलपणा कमी करेन, पूर्वीसारखा हसतमुख झाल्यावरच प्रेक्षकांच्या समोर येईन असे कपिलने काही दिवसांपूर्वी सांगितले.

लेखक मंडळींनाही राईटर्स ब्लॉक नावाचा विचित्र ट्रॉमातून काहीवेळा जावे लागते. लिहायला काही म्हणजे काहीच सुचत नाही. त्यामुळे जराशी नकारात्मक, निराशावादी मानसिकता तयार होते. सतत वाचण्याचीही ईच्छा होत नाही. कपील हा तर त्याच्या शोचा एकमेव ‘कल्पतरू’. मुख्य कलाकार, लेखक, संकल्पक, दिग्दर्शक त्याच्या या अशा होण्याने कुठल्या गंभीर मानसिकतेतून तो जातोय याची कल्पनाच न केलेली बरी.

बॉलिवूड असो मराठी चित्रपटसृष्टी असो अनेक कलावंतांना या परिस्थितीतून जायला लागलं आहे. यातून बाहेर पडायला काही गोष्टींची मदत आवश्यक आहे. जसे की जवळची माणसे, मित्र, जिव्हाळा,प्रेम देणारी नाती, शांत झोप, अध्यात्म किंवा सोप्या शब्दात स्वतःशी संवाद आणि सकारात्मक दृढ विश्वास. कपील यातून पूर्णपणे बरा होऊन लवकरच परत यावा हीच इच्छा आहे. त्याच्यात प्रचंड ऊर्जा होती, ती अशी एकाकी संपली जाईन यावर विश्वास बसणेच अवघड आहे. त्या उर्जेसह त्याने पुन्हा सगळ्या प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घ्यावा याच त्याला शुभेच्छा. मनस्थिती पूर्ववत होईपर्यंत आपलं आयुष्य त्याने कागदावर उतरवायला तरी सुरूवात करायला हवी.ज्याने तो व्यसनांपासून दूर राहील, स्वतःशी संवाद वाढीस लागेल.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#MeToo : संस्कारी बाबूजीआलोक नाथचे सिन्टाचे सदस्यत्व रद्द 

News Desk

संदीप कुलकर्णी आता निर्मात्याच्या भूमिकेत

News Desk

गणेशोत्सवानिमित्त ‘चला एका अनवट विषयावर बोलू काही’

News Desk