HW News Marathi
देश / विदेश

पंतप्रधानांच्या राहुल गांधींना शुभेच्छा

नवी दिल्ली | काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा आज 48 वा वाढदिवस आहे. काँग्रेस कार्यकर्ते संपूर्ण देशभरात काँग्रेस अध्यक्षांचा वाढदिवस साजरा करत आहेत. काँग्रेस अध्यक्ष झाल्यानंतरचा राहुल यांचा हा पहीलाच वाढदिवस आहे. तर वाढदिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ट्विटरद्वारे राहुल गांधींना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा मी त्यांच्या दीर्घ आणि निरोगी आयुष्यासाठी प्रार्थना करतो, अशा आशयाचे ट्विट मोदींनी केले आहे.

राहुल गांधीं अध्यक्ष बनल्यानंतर पक्षाला चांगलीच उभारी आली आहे . 2004 मध्ये राहुल यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केला त्यानंतर राजकारणाची सुरुवात करण्यापासून काँग्रेस अध्यक्ष बनण्यापर्यंत राहुल गांधींमध्ये फार बदल झाले आहेत. त्यांच्या राजकारणाची पद्धतही बदलली आहे. मागील वर्षी पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर त्यांनी गुजरात आणि कर्नाटक निवडणूक ज्या पद्धतीने लढवली, त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांना नवी उभारी मिळाली. गुजरातमध्ये पक्षाला विजय मिळाला नसला तरी कर्नाटकमध्ये भाजपला अखेर त्यांनी मात दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

संतापजनक ! संजय राठोडांसोबत चित्रा वाघ यांचे ‘मोर्फ’ केलेले आक्षेपार्ह फोटोज व्हायरल

News Desk

मेणबत्ती फुंकून वाढदिवस साजरा करणे आरोग्याला घातक

News Desk

“मोदीसाहेब, पश्चिम बंगालमधील पराभवाचा राग पेट्रोल – डिझेलवर का काढताय?”,रुपाली चाकणकरांचा सवाल

News Desk
मुंबई

आयसीआसीआय बँकेच्या संचालक आणि सीओओ पदावरुन चंदा कोचर यांची उचलबांगडी

News Desk

मुंबई | आयसीआसीआय बँकेच्या प्रमुख चंदा कोचर यांना संचालक आणि सीओओ पदावरुन हटवण्यात आले आहे. चौकशीपर्यंत त्यांना पदावरुन दूर करत सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. आयसीआयसीआय बँकेच्या संचालक मंडळाने सोमवारी संदीप बक्षी यांची संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारीपदी (COO) नियुक्ती केली. त्यामुळे आता आयसीआयसीआय प्रोडेंशिअलचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी संचालक पदावर कार्यरत असलेले बक्षी आज 19 जूनपासून बँकेचे सीओओ पद सांभाळतील.

संदीप बक्षी यांना पाच वर्षांसाठी नियुक्त करण्यात आले आहे. संदीप बक्षी हे आजपर्यंत आयसीआयसीआय प्रुडेंशियल लाईफ इन्शुरन्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम सांभाळत होते परंतु आजपासून संदीप बक्षी आयसीआयसीआय बँकेच्या सीओओ पदाचा भार सांभाळतील.

संदीप बक्षी बँकेचे सर्व व्यवहार हाताळणार आहेत त्यामुळे बोर्डाचे सर्व कार्यकारी संचालक आणि व्यवस्थापकीय संचालक सर्वजण संदीप बक्षी यांनाच रिपोर्ट करतील. मात्र संदीप बक्षी बँकेच्या एमडी आणि सीईओ चंदा कोचर यांनाच रिपोर्ट करतील. पण चंदा कोचर जोपर्यंत रजेवर असतील तोपर्यंत संदीप बक्षी बँकेच्या बोर्डाच्या पदाधिका-यांना रिपोर्ट करतील. चंदा कोचर यांच्यावरील आरोपांची चौकशी सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायमूर्ती बीएन श्रीकृष्ण यांच्यावर सोपवण्यात आली असुन न्यायमूर्ती श्रीकृष्ण यांच्या नेतृत्त्वात आयसीआयसीआय बोर्डाने व्हिडीओकॉन कर्ज प्रकरणाची स्वतंत्र चौकशी केली आहे.

Related posts

लोकल अजूनही रुळांवर येईना!

News Desk

शिना बोरा हत्याकांडातील आरोपी इंद्राणी मुखर्जीची प्रकृती बिघडली

News Desk

कृषिपंपांच्या वीज जोडण्यांसाठी सौर कृषिवाहिनी, एचव्हीडीएस योजनेच्या कामांना आणखी वेग द्या

News Desk