HW News Marathi
देश / विदेश

विजय माल्याला द्यावी लागणार भारतीय बँकांना भरपाई | ब्रिटन कोर्ट

लंडन | भारतातील बँकांमधून घेतलेले कोट्यवधी रूपयांचे कर्ज बुडवून परदेशात पळून गेलेल्या विजय माल्याला ब्रिटन हाय कोर्टाने भारतीय बॅंकाना भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. भारतातल्या १३ बँकांना तब्बल १ कोटी ८० लाख रुपये भरपाई देण्याचे आदेश ब्रिटन हाय कोर्टाने विजय माल्याला दिले आहेत. शुक्रवारी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने विजय मल्ल्याला भारतीय बँकांना २ लाख पाऊंड्सची भरपाई देण्याचे आदेश दिले. विजय माल्याला दिलेले कर्ज त्याच्याकडून परत घेण्यासाठी या १३ बँका कायदेशीर लढाई लढत आहेत.

गेल्या महिन्यात न्यायमुर्ती अँड्र्यू हेन्शॉ यांनी विजय माल्याची संपत्ती गोठविण्यासंदर्भातील निर्णय बदलायला स्पष्ट नकार दिला होता. ‘माल्याने बँकांना नुकसान भरपाई द्यावी, असा आदेश कोर्टाने दिला आहे. कुठल्याही एका रकमेवर दोन्ही पक्षांनी सहमत व्हावे, किंवा कोर्ट बँकांकडून कायदेशीर प्रक्रियेवर केलेल्या खर्चाचे आकलन करेल. कोर्टाकडून खर्चाचे आकलन करणे एक वेगळी प्रक्रिया आहे. यासाठी ब्रिटनच्या एका विशेष कोर्टात सुनावणी केली जाते. दरम्यान, माल्या बँकांना कायदेशीर खर्चाचे कमीत कमी २ लाख पाऊंड देईल असेही सांगण्यात आले आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंतप्रधानांनी केली पीएम-श्री योजनेची घोषणा

Manasi Devkar

चीनची पुन्हा भारतात घुसखोरी

Gauri Tilekar

सुशांतची हत्या झालेली नाही, AIIMSकडून शिक्कामोर्तब

News Desk