HW News Marathi
महाराष्ट्र

अभाविपचे सेल्फी विथ कॅम्पस अभियान, महिला सशक्तीकरणासाठी ‘मिशन साहसी’

मुंबई : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक २८ ते ३० मे दरम्यान गुवाहाटी आणि आसाम येथे आयोजित करण्यात आले होते. या बैठकीत देशभरातील सर्व राज्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. येथे अनेक शैक्षणिक, सामाजिक परिस्थिती आणि ईशान्य भारतातील विकास यावर चर्चा करण्यात आली. या तीन दिवसीय बैठकीत विद्यार्थी समाज हित लक्षात घेत काही अभियान, कार्यक्रम आणि आंदोलनांद्वारे अभाविपच्या पुढील शैक्षणिक सत्राची दिशा ठरविण्यात आली असल्याची माहिती अभाविप मुंबई महानगराचे मंत्री रवी जयस्वाल यांनी मराठी पत्रकार संघात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

अभाविपच्या माध्यमातून या वर्षी देशभरातील १ लाख महाविद्यालयांना संपर्क करण्याचे अभियान राबविण्यात येणार आहेत. कॅम्पस कॅम्पस (सेल्फी विथ कॅम्पस) संपर्क अभियानाच्या माध्यमातून अभाविपचे कार्यकर्ते ३० जुलै ते ४ ऑगस्ट दरम्यान देशभरातील कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयांना भेटी देणार आहेत. तसेच अनुसूचित जाती आणि जमातीच्या विद्यार्थीशी ‘सवांद अभियान’ सप्टेंबर मध्ये चालविण्यात येणार असल्याची पत्रकार परिषदेत अभाविप राष्ट्रीय महामंत्री आशिष चौहाण यांनी माहिती दिली आहे.

या अभियानच्या माध्यमातून अनुसूचित जाती आणि जमातीच्या वसतिगृहात जावून अभाविप विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. अनुसूचित जाती आणि जमाती वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थांना मिळणारा १५० रु ते ३०० तुटपुंजा भत्यात वाढ करण्यात यावी. अशी मागणी अभाविपच्या वतीने करण्यात येणार आहे. यासाठी अभाविप या सत्रात सर्वच राज्य सरकारांकडे तो वाढविण्यासाठी मागणी करण्यात येईल. तसेच राष्ट्रीय सुरक्षा व सामाजिक दृष्टीकोनातून आसाममध्ये होत असलेल्या ‘NRC Update’ ला अभाविपचा पाठींबा असणार आहे.

महिला सशक्तीकरणासाठी ‘मिशन साहसी’

देशभरातील कॉलेज कॅम्पसमध्ये महिलांच्या सशक्तीकरणासाठी अभाविपच्या वतीने ‘मिशन साहसी’ आत्म संरक्षणाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या माध्यमातून सर्वच राज्यात याचे प्रशिक्षण शिबिरेंचे कार्यक्रम प्रमुख शहरात आयोजित केले जाणार आहे. ३० ऑक्टोबर २०१८ रोजी देशभरातील १००० स्थानांवर प्रशिक्षणाचे भव्य कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. तसेच ४ ते ७ जून दरम्यान नवी मुंबई येथे झालेल्या प्रदेश अभ्यासवर्गात २०० विद्यार्थी उपस्थित होते. या पत्रकार परिषदेत अभाविप कोंकण प्रदेश मंत्री व केंद्रीय कार्य समिती सदस्य अनिकेत ओव्हाळ, राष्ट्रीय महामंत्री आशिष चौहान, राष्ट्रीय सहसंघटमंत्री श्रीनिवासजी उपस्थित होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आव्हाडांच्या ‘त्या’ वादग्रस्त विधानानंतर पडळकर आक्रमक; महाविकासआघाडी सरकारवरही हल्लाबोल

Aprna

व्यंगचित्रातून राजकारणाची चित्रे रेखाटणारे एक राजकीय नेते

swarit

गँगस्टर एजाज लकडावाला मुंबई पोलिसांच्या अटकेत, २१ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी

News Desk