HW News Marathi
मुंबई

मुंबई विद्यापीठाच्या नामांतराचा वाद

मुंबई | सोलापूर विद्यापीठाच्या नामांतराचा वाद ताजा असतानाच आता मुंबई विद्यापीठाचं नाव राजमाता जिजाऊ भोसले मुंबई विद्यापीठ करा, अशी मागणी करण्यात आली आहे. ही मागणी शिवसेनेचे नगरसेवक दत्ता नरवणकर यांनी याबाबतचा प्रस्ताव मुंबई महापालिकेत सादर केला आहे.

सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकर यांचं नाव देण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती. मात्र सोलापूर विद्यापीठाच्या नामकरणाला शिव अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेसह अन्य काहींनी जनहित याचिकेद्वारे आव्हान दिलं होतं. त्यावर कोणताही निर्णय झालेला नसताना राज्य सरकार असा निर्णय घेऊ शकत नाही, असा दावा या याचिकेतून करण्यात आला होता. त्यानंतर हा वाद हायकोर्टात गेल्यानंतर नामांतर लांबणीवर पडलं आहे.

नावे बदलेली विद्यापीठ

१) मराठवाडा विद्यापीठ – डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ

२) पुणे विद्यापीठ – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

 

Related posts

एलएलसी कंपाऊंडला लागली आग

News Desk

मुंबई महानगर क्षेत्रात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करणार! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Aprna

ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकलसेवा विस्कळीत

News Desk
क्रीडा

सुवर्णपदक विजेता कुस्तीपटू नरसिंग यादवने घेतली आठवलेंची भेट

News Desk

नवी दिल्ली | कॉमन वेल्थ गेम्स मध्ये सुवर्णपदक विजेता ठरलेला भारताचा कुस्तीपट्टू नरसिंग यादव यांनी आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची त्यांच्या नवी दिल्लीतील शास्त्रीभवन येथील दालनात भेट घेतली.

सुवर्णपदक विजेता कुस्तीपट्टू नरसिंग यादव यांच्यावर अन्नचाचणीत दोषी आढळल्याने 4 वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. तसेच त्यांच्याविरुद्ध सीबीआय चौकशी सुरू आहे. ही चौकशी लवकर पूर्ण झाल्यास आपण निर्दोष सिद्ध होऊ असे मनोगत नरसिंग यादव यांनी यावेळी रामदास आठवलेंकडे व्यक्त केले.

तसेच कुस्तीपट्टू नरसिंग यादव हे सध्या मुंबई पोलिसात सहाय्यक पोलीस आयुक्त पदावर कार्यरत आहेत. त्यांना मिळणारा पगार अपुरा असल्याची खंत त्यांनी रामदास आठवलेंकडे व्यक्त केली. याप्रकरणी कुस्तीपट्टू नरसिंग यादव यांना न्याय मिळवून देण्यासाठी योग्य तो प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन रामदास आठवलेंनी यांनी दिले.

 

Related posts

राज्य शालेय अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेत १००० स्पर्धक सहभागी होणार

Gauri Tilekar

डॉ. रवींद्रकुमार सिंघल ठरले ‘आयर्नमॅन २०१८’

Gauri Tilekar

आयसीसीकडून तीन खेळाडूंवरील मॅच फिक्सिंगचे आरोप निश्चित

News Desk