HW News Marathi
देश / विदेश

गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर गिरीश कर्नाड रडावर

बंगळुरू | ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणातील संशयित मारेकऱ्यांच्या हिटलिस्टवर दिग्दर्शक गिरीश कर्नाड असल्याची माहिती समोर आली आहे. केवळ गिरीश कर्नाडचं नव्हे तर कर्नाडांसह आणखी काही नामवंतांची नावे पुढे आली आहेत. ही धक्कादायक माहिती तपास अधिकाऱ्यांनीच दिली असून यामध्ये गिरीश कर्नाड यांच्यासह साहित्यिक बी. टी. ललिता नाईक, निदुमामिदी मठाचे स्वामी वीरभद्र चन्नमल्ला, पुरोगामी विचारवंत सी. एस. द्वारकानाथ यांच्या नावाचाही समावेश असल्याची माहिती तपासात समोर आली आहे

लंकेश यांच्या हत्या प्रकरणात विशेष तपास पथकाने पराशुराम वाघमारे, के. टी. नवीन ऊर्फ होटे मांजा, अमोल काळे, मनोहर येडवे, सुजीत कुमार ऊर्फ प्रवीण, अमित देगवेकर या सहा जणांना अटक केलेली आहे. लंकेश पत्रिकेच्या संपादिका गौरी लंकेश यांची 5 सप्टेंबर 2017 रोजी त्यांच्या बंगळुरुतील घराबाहेर गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाच्या तपासासाठी कर्नाटक सरकारने एका विशेष तपास पथकाची स्थापना केली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जम्मू-काश्मीरमधील पुलवामात ३ दहशतवाद्यांचा खात्मा

News Desk

घरगुती वापरातील गॅस महागला  

News Desk

ट्रम्प यांच्या पराभवाने त्यांच्या समर्थकांचा  वॉशिंग्टनमध्ये हिंसाचार

News Desk