HW News Marathi
मुंबई

केडीएमसीच्या अतिरिक्त आयुक्तांनी घेतली ८ लाखांची लाच

कल्याण | कल्याण-डोंबिवली महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांना ८ लाखांची लाच घेताना ठाण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. संजय घरत यांनी अनधिकृत बांधकामावर कारवाई करु नये म्हणून त्यांनी संबंधिताकडे ४२ लाख रुपयांची मागणी केली होती.

परंतु संबंधितांनी तडजोडकरुन ३५ लाख रुपये देण्याचे ठरले. त्यापैकी ८ लाखांचा पहिला हफ्ता आपल्या कार्यालयात घेणार असल्याची माहिती ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला माहिती मिळाली होती. त्यानंतर दुपारी ३च्या सुमारास संजय घरत यांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले असून त्यांना अटक करण्यात आले आहे.

घरत यांना अटक झाल्याचे कळताच महापालिकेतील प्रशासकीय इमारतीमध्ये पत्रकार, राजकारणी आणि बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. घरत पालिकेचे जुने अधिकारी असल्याची माहिती मिळाली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईचा कायापालट करण्यासाठी गृहनिर्माण प्रकल्पांना गती द्यावी! – उपमुख्यमंत्री

Aprna

संघाच्या आदेशाने चालणारे सरकार आरक्षणविरोधीः अशोक चव्हाण

News Desk

कोस्टल क्लीनअप डे’चा उत्साह, श्रमदानाने युवकांनी केली दादर चौपाटीची स्वच्छता

News Desk