HW News Marathi
महाराष्ट्र

बीडमध्ये तहसीलच्या ढिसाळ कारभाराच्या विरोधात काँग्रेस आयचे परळी तहसीलदार कार्यलायसमोर ठिय्या आंदोलन

बीड | महाविकासआघाडी सरकारमध्ये घटक पक्ष म्हणून काँग्रेस आय हा एक मुख्य पक्ष म्हणून असून देखील बीड जिल्ह्यात मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एकल हाती सत्ता सुरू असल्याचे वारंवार निदर्शनास येत आहे, पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या मतदार संघ असलेल्या परळी तहसील कार्यालयात सुरू असलेला मनमानी कारभार थांबन्यासाठी काँग्रेस आयचे परळी शहर अध्यक्ष बहादुर भाई यांनी या विरोधात आवाज उचलला म्हणून त्यांच्यावर परळी तहसील कार्यालयाच्या मार्फत त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले असून याच्या निषेदार्थ काँग्रेस चे जिल्हा अध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांच्या नेतृत्वात परळी तहसील च्या प्रांगनात ठिय्या आंदोलन उभारण्यात आले आहे

गोरगरिबांच्या हक्काचे राशेन त्यांना मिळण्याच्या मागणीसाठी आवाज उठवला म्हणून परळी काॅंग्रेस शहराध्यक्षांसह जवळपास २५ जणांवर सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आले. महसूल प्रशासन काम करताना पक्षपातीपणा करत असल्याचा आरोप करीत काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते संतप्त होऊन त्यांनी तहसील कार्यालयात आक्रमक आंदोलन केले. या आंदोलना दरम्यान नायब तहसीलदार रुपनर यांच्या दालनात बेशरम च्या फांद्या देऊन त्याचा सत्कार करण्यात आला. या प्रकरणाने नविन वळण घेतले आहे.या पार्श्वभूमीवर परळी काॅंग्रेस शहराध्यक्षांसह जवळपास २५ ते ३० कार्यकर्त्यांवर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गुरनं 54/2022 कलम 353,143, 506, भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे खोटे गुन्हे मागे घेतले जवे आणि १५५७ लोकांच्या राशेन कार्ड हे ऑनलाईन करून त्यांची डेटा एन्ट्री तात्काळ करण्यात यावी या मागणीसाठी परळी तहसील समोरील प्रांगणात काँग्रेस आय ने उभारले ठिय्या आंदोलन कर्त्यांच्या म्हणण्यानुसार जोपर्यंत या मागण्या पूर्ण केल्या जात नाहीत तोपर्यंत हे ठिय्या आंदोलन सुरू असणार असल्याचा इशारा जिल्हाध्यक्ष देशमुख यांनी दिला आहे. तात्काळ प्रशासनाने निर्याय घेतला गेला नाही तर आंदोलन तीव्र करण्यात येणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

BMC मध्ये उड्डाणपुलाच्या कामाच्या कंत्राटात भ्रष्टाचार झाल्याचा भाजप आमदाराचा आरोप

Aprna

नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यातच मार्केटमध्ये हापूस दाखल

swarit

बाळासाहेबांना अटक करणाऱ्या बीजेपी सरकारचा जाहीर निषेध !

News Desk