HW News Marathi
महाराष्ट्र

विठ्ठल-रुक्मिणी मंदिर देवस्थानच्या विकासासाठी अर्थसंकल्पात ७४ कोटींची तरतूद केल्याबद्दल मंदिर देवस्थानाकडून उपमुख्यमंत्र्यांचे आभार

मुंबई | पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या विकास अराखड्यासाठी अर्थसंकल्पात ७३ कोटी ८० लाख रुपयांचा निधी मंजूर केल्याबद्दल श्री विठ्ठल – रुक्मिणी मंदिर समितीच्या शिष्टमंडळाने आज (मंगळवार, २९ मार्च) उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन अभिनंदन केले तसेच आभार मानले. श्री विठ्ठल – रुक्मिणी देवस्थानच्या विकासासाठी सर्वतोपरी मदत केली जाईल, अशी ग्वाही सुध्दा अजित पवार यांनी यावेळी दिली.

श्री. विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या शिष्टमंडळाने मंत्रालयात अजित पवार यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले. अजित पवार यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात संत ज्ञानेश्वर माऊलींच्या ७२५ व्या समाधी वर्षानिमित्त नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथील संत निवृत्ती महाराजांचे समाधीस्थळ, पुणे जिल्ह्यातील आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराजांचे समाधीस्थळ, पुणे जिल्ह्यातील सासवड येथील संत सोपानकाका महाराजांचे समाधीस्थळ, जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथील संत मुक्ताई यांच्या समाधीस्थळाच्या विकासासाठी आवश्यक निधीची तरतूद करण्याची घोषणा केली आहे, त्याबद्दलही देवस्थान समितीने अजित पवारांचे अभिनंदन करुन आभार मानले.

यावेळी विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, विठ्ठल मंदिर रुक्मिणी समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव, व्यवस्थापक बालाजी पुलवड, शकुंतलाताई नडगिरे, डॉ. दिनेशकुमार कदम, संभाजी शिंदे, ॲड माधवी निगडे आदी मान्यवर उपस्थित होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कर्जमाफी झालेल्या शेतक-यांकडून व्याज घेऊ नका , बॅंकाना आदेश- मुख्यमंत्री

News Desk

माझ्या वाढदिवसाला शुभेच्छांचे होर्डिंग्ज नको !

News Desk

जवळपास 28 तास पार्थ पवार यांच्या कार्यालयावर आयकरची छापेमारी!

News Desk