HW News Marathi
महाराष्ट्र

उद्धव ठाकरे आणि हवाला किंग नंदकिशोर चतुर्वेदींचे संबंध काय?, किरीट सोमय्यांचा सवाल

मुंबई | भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईनंतर पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा ठाकरे कुटुंबियांवर निशाणा साधला. उद्धव ठाकरे आणि हवाला किंग नंदकिशोर चतुर्वेदी यांचे संबंध काय?, असा सवाल किरीट सोमय्या यांनी आज (२३ मार्च ) घेतलेल्या पत्रकार परिषदेतून उपस्थित केला आहे. सोमय्यांनी राज्याचे पर्यावरण मंत्री आणि उद्धव ठाकरेंची पत्नी रश्मी ठाकरे यांच्यावरही टीका केली आहे. 

सोमय्या म्हणाले, “आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी २०१४ मध्ये कोमास स्टॉक अॅण्ड प्रॉपर्टीज कंपनी स्थापन केली. या कंपनीत आदित्य ठाकरे हेच मालक आणि संचालक होते. या कंपनीमध्ये आदित्य ठाकरे हे पाच वर्ष संचालक पदी होते. यानंतर आदित्य ठाकरेंनी संचालक पदाचा राजीनामा दिला. यानंतर मोठा हवाला किंग नंदकिशोर चतुर्वेदी यांच्या मालकीच कोमास स्टॉक अॅण्ड प्रॉपर्टीज कंपनी झाली. या कंपनीत ३० कोटी व्यवहाराचा समावेश असून ठाकरे कुटुंबियांच्या कंपनी बनवली होती. मग नंदकिशोर चतुर्वेदींना ही कंपनी का दिली?, नंदकिशोर चतुर्वैदी आणि ठाकरे कुटुंबाचे संबंध काय? आणि ठाकरे कुटुंबियांचा पहिलाच मनी लाँड्रिंग व्यवहार आहे का?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला होती. 

मुख्यमंत्र्यांचे मेहुण्यांच्या श्री साईबाबा गृहनिर्मिती प्रा. लि. कंपनीवर काल (२२ मार्च) ईडीने कारवाई केली. ईडीने पाटणकरांच्या ठाण्यातील निलांबरी प्रकल्पातील ११ सदनिका जप्त केल्या असून पाटणकरांच्या ५ कोटी ४५ लाखांची संपत्ती जप्त केली आहे. यापूर्वी ईडीने पुष्पक बुलियन समूह कंपन्यांविरोधात ६ मार्च २०१७ रोजी गुन्हा नोंदविण्यात आला होता. या प्रकरणी ईडीने २१ कोटी ४६ लाख रुपयांची संपत्ती जप्त केली होती. 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कर्जमाफीऐवजी शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करा – आ. प्रशांत बंब यांची मागणी  

News Desk

Belgaum Election | भाजपच्या मंगला अंगडी विजयी, काँग्रेसच्या सतीश जारकीहोळी यांचा २९०३ मतांनी पराभव

News Desk

परदेश शिष्यवृत्तीसाठी आता ६ लाख रुपये उत्पन्नाची मर्यादा

News Desk