HW News Marathi
महाराष्ट्र

महागाईचा भडका! पेट्रोल-डिझेलसोबत आता घरगुती गॅस सिलेंडरमध्ये वाढ

मुंबई | गेल्या २७ दिवसांपासून रशिया-युक्रेनमध्ये युद्धमुळे कच्चा तेलाच्या किंमती वाढ झाली आहे. भारतात देखील तेलच्या किंमतीमध्ये मोठी वाढ झाली आहे. नुकतेच देशात पाच राज्यांच्या निवडणुकीचे निकाल हातील आले आहे. यानंतर आता पेट्रोल-डिझेल आणि घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत वाढ झाली आहे. भारतात पेट्रोल-डिझेलमध्ये ८० पैशांनी वाढ झाली. तसेच आज (२२ मार्च) घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात ५० रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. या महागाईचा फटका मध्यवर्गीय कुटुंबाना चांगले चटके बसणार आहेत. 

यापूर्वी २०१९ मध्ये घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ झाली होती. यानंतर आता घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत ५० रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. देशाची राजधानी दिल्लीमध्ये घरगुती गॅस सिलेंडरसाठी ९४९ रुपये ५ पैसे मोजावे लागणार आहेत. यापूर्वी दिल्लीकरांना ८९९ रुपये ५० पैसे मोजावे लागत होते. मुंबईकरांना घरगुती गॅस सिलेंडरसाठी ८९९ रुपये ५ पैशांच्या जागी आता ९४९ रुपये ५ पैसे मोजावे लागणार आहेत. चेन्नईमध्ये  ९६५ रुपये ५ पैसे, लखनऊमध्ये ९८७ रुपये ५० पैसे रुपये आणि पाटणामध्ये घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत १०३९ रुपये ५० पैशांची वाढ झाली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सध्या ‘मनसे’सोबत युती नाही, कार्यपद्धती बदलली तर युतीवर चर्चा करण्यासाठी तयार !

News Desk

“परमबीर सिंह-सचिन वाझेंची भेट नियमबाह्य, पोलिसांकडून होणार चौकशी!” – गृहमंत्री

News Desk

सरकार पडण्याचा प्रयत्न करणे ही आमची संस्कृती नाही -चंद्रकांत पाटील

News Desk