HW News Marathi
महाराष्ट्र

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अडथळे आणणाऱ्यांना उच्च न्यायालयाची चपराक ! – नाना पटोले

मुंबई | Maharashtra Pradesh Congress Committee (MPCC) president Nana Patole has said that the Mumbai High Court has rejected the plea of former minister Girish Mahajan and Bharatiya Janata Party (BJP), who were trying to prevent the by-elections by obstructing the assembly polls.

विधिमंडळ आवारात प्रसार माध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, भारतीय जनता पक्ष जाणीवपूर्वक विधानसभा निवडणुकीच्या प्रक्रियेत अडथळे आणण्याचे काम करत आहे. कुठलातरी कायदा पुढे करुन न्यायालयात याचिका दाखल करायची परंतु त्यांच्या या प्रवृत्तीला मा. उच्च न्यायालय मुंबई यांनी त्यांची याचिका फेटाळत १२ लाख रुपयेही जप्त करुन मोठी चपराक दिली आहे. भाजपने आतातरी लोकशाहीची वस्तुस्थिती समजून घेतली पाहिजे. जाणीवपूर्वक कोर्टात जायचे आणि चांगले काम सुरू आहे त्याला कोर्टात आव्हान द्यायचे काम भाजपने बंद करावे. राज्यपाल महोदय यांना माझी विनंती आहे की त्यांनी आता लवकरात लवकर निर्णय घ्यावा.

राज्य विधिमंडळाचा अर्थसंकल्प ११ तारखेला सादर केला जाणार आहे. त्याआधी अध्यक्षपदाची निवडणूक पार पडावी अशी आमची इच्छा आहे. अशोक चव्हाण, अनिल परब, अजित पवार यांनी राज्यपाल महोदय यांची काल भेटही घेतली आहे. अर्थसंकल्पाच्या आधी अध्यक्षपदाची निवडणूक पार पडावी आणि राज्यपाल त्यादृष्टीने निर्णय घेतील असा आमचा विश्वास आहे, असे पटोले म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ED चं समन्स आणि खडसेंची तब्येत खालावली, आजची पत्रकार परिषदही रद्द

News Desk

१० रुपयाचे नाणे घेण्यास ग्रामीण भागातील बँकांचा नकार ,मॅनेजरने शेतक-याला बँकेतून बाहेर काढले.

News Desk

मॉडेलला दिल्लीला जायचे होते, पोहचली तुरूंगात: पोलिसांसोबत केली मस्करी

News Desk