HW News Marathi
राजकारण

पालकमंत्री छगन भुजबळांच्या हस्ते मुख्यमंत्री रोजगार योजनेतील वाहनांचे वितरण

नाशिक | महाविकास आघाडी सरकारच्या मुख्यमंत्री रोजगार योजने अंतर्गत बेरोजगाराना स्वयंम रोजगार मिळवून देण्यासाठी आर्थिक साहाय्यातून वाहने वितरित करण्यात येत आहे. लाभार्थ्यांनी त्यांना मिळालेल्या संधीच सोन करून स्वयंम रोजगरातून साधावी प्रगती साधावी असे आवाहन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले. नाशिक येथील कार्यालयात मुख्यमंत्री रोजगार योजनेच्या अंतर्गत वाहनांचे वितरण पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

पालकमंत्री छगन भुजबळ यावेळी म्हणाले की, “महाविकास आघाडीच्या वतीने राबविण्यात आलेला हा उपक्रम राज्यभरातील बेरोजगारांसाठी अतिशय महत्वपूर्ण आहे. या योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना साडे तीन लाखांपर्यंत सबसिडी देण्यात येत असून महाराष्ट्र बँकेच्या माध्यमातून अल्पदरात कर्ज उपलब्ध करून देण्यात आली आहे.”

स्वयंम रोजगारातून उभं राहण्यासाठी ही महत्त्वाची संधी! 

“गेली दोन वर्षे कोरोनाच्या काळात गेले असून अनेकांनी रोजगार देखील गमावला. त्यांना स्वयंम रोजगरातून उभं राहण्यासाठी ही महत्त्वाची संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. लाभार्थ्यांनी जिद्द आणि चिकाटी बाळगून व्यवसायात सातत्य ठेऊन प्रगती करावी असे”, असं आवाहन करत यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी लाभार्थ्यांना त्यांच्या पुढच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

माजी आमदार जयवंत जाधव, जिल्हाध्यक्ष ऍड.रवींद्र पगार, कोंडाजी आव्हाड, प्रदेश पदाधिकारी दिलीप खैरे, नानासाहेब महाले, बाळासाहेब कर्डक, युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे, नगरसेवक जगदीश पवार, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष समाधान जेजुरकर, पंचवटी विभागीय अध्यक्ष शंकर मोकळ, दत्ता पाटील, चिन्मय गाढे आदींसह यावेळी मोठ्या संख्येने लाभार्थी उपस्थित होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नेत्यांच्या आवडीचा विषय म्हणजे बदल्या !

News Desk

दिग्विजय यांचे मोदींना आव्हान, हिंमत असेल तर माझ्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा

News Desk

वीर जवानांना श्रद्धांजली वाहणे व मानवंदना देणे हा आता एक ‘राष्ट्रीय’ कार्यक्रम !

News Desk