HW News Marathi
महाराष्ट्र

मराठा आरक्षणासाठी संभाजीराजे यांचे आजपासून आमरण उपोषण

मुंबई। भाजपचे खासदार संभाजीराजे छत्रपती हे मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून आजपासून आमरण उपोषणाला बसणार आहे. संभाजीराजे हे आज (२६ फेब्रुवारी) आझाद मैदानावर उपोषणाला बसणार आहेत. संभाजीराजे यांनी १४ फेब्रुवारीला पत्रकार परिषद घेऊन ते उपोषण करणार असल्याची माहिती दिली होती.

दरम्यान, संभाजीराजे हे आज सकाळी १०.३० वाजता मरीन ड्राईव्ह येथून त्यांच्या समन्वकांसोबत हुतात्मा चौक पोहोचून स्मारकास अभिवादन करणार आहे. तसेच आझाद मैदानात ११.१५ वाजताच्या सुमारास पोहचणार आहे. यानंतर संभाजीराजे पत्रकारांशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर संभाजीराजे हे ११.३० वाजता उपोषण सुरू करणार आहेत.

संभाजीराजे १४ फेब्रुवारी पत्रकारांशी बोलताना नेमके काय म्हणाले

संभाजीराजे म्हणाले, “सर्व पक्षांच्या नेत्यांना हात जोडून विनंती करतो की, मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्यावे. न्यायालयात आरक्षण कशामुळे गेले हे सांगितले, परंतु यासंदर्भात राज्य सरकारकडून काहीच हालचाल झाली नाही. आरक्षण रद्द केल्यानंतर पुर्नविचार याचिका देखल करा, असे देखील मी सांगितले होते. मात्र, उशीराने पुर्नविचार याचिका दाखल केली. या पुनर्विचार याचिकेची काय परिस्थिती आहे, हे कोणालाच काही माहिती नाही. यासंदर्भात समिती स्थापन करा, असे माझे स्पष्ट मत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आर्यन खान डील प्रकरणात समीर वानखेडेंचा संबंध?; साक्षीदार विजय पगारे यांचा मोठा खुलासा

News Desk

चांदणी चौकातील वाहतूक समस्या सोडवून जनतेला दिलासा द्या! – मुख्यमंत्री

News Desk

थोर विधीरत्न राम कदमांना केंद्र आणि राज्य सरकारमधला फरकही कळत नाही!

News Desk