HW News Marathi
महाराष्ट्र

यावर आता काय बोलयाचे, यात काही नवीन नाही! – शरद पवार

मुंबई | दाऊद इब्राहिम मनी लॉड्रिंग प्रकरणी राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी नेण्यात आले. मलिकांच्या घरी ईडीचे अधिकारी आज (२३ फेब्रुवारी) सकाळी ४. ३० वाजता पोहोचले. यानंतर मलिकांना ७.४५ वाजता त्यांना चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी घेऊन गेले असून सध्या त्यांची चौकशी सुरू आहे. यानंतर राज्याचे राजकारणात चर्चेला उधाण आले आहे. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली, “यावर आता काय बोलायचे हे काही नवीन नाही, कुठल्याही प्रकरणी काढून मलिकांना अडकवण्याचा प्रयत्न सुरू होते. याची आम्हाला खात्री होती.”

शरद पवार म्हणाले, “यावर आता काय बोलयाचे, यात काही नवीन नाही. कुठलेही तरी प्रकरण काढून मलिकांना अडवले जाण्याचा प्रयत्न होणार,  याची मला खात्री होती. आज ना उद्या हे घडेल, काही तरी प्रकरण काढून मलिकांना असा त्रास दिला जाईल यांची आम्हाला कल्पना होती. त्यामुळे याप्रकरणी अधिक भाष्य करायची गरज वाटत नाही. साधा कार्यकर्ता असेल की दाऊचे नाव घ्यायचे आणि अडकवायचे प्रकार सुरू आहेत. तुम्हाला कदाचित माहिती असेल, तेव्हा तुम्ही लहान असाल, त्याकाळी माझ्यावरही असाच आरोप झाला होता. तेव्हा मी मुख्यमंत्री होतो. आता याला २५ एक वर्ष झाली असेल. अशी नावे घेऊन लोकांना बदनाम करणे, त्यांना त्रास देणे.”

गेल्या आठवड्यात ईडीच्या दिल्ली आणि मुंबईतील पथकांनी दाऊतची बहिण हसिना पारकर आणि भाऊ इक्बाल कासकर यांच्या कुटुंबियांच्या मुंबईतील घरीत छापेमारी करून चौकशी केली होती. इक्बाल कासकरांची चौकशी केल्यानंतर मलिकांना समन्स बजावण्यात आला होता. त्यानंतर ईडीने आज (२३ फेब्रुवारी) पहाटे ४. ३० वाजता त्यांच्या घरी पोहोचले आणि यानंतर त्यांना सकाळी ७ वाजता ईडीच्या कार्यलयता घेऊन गेले तर ७.४५ वाजल्यापासून चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात घेऊन गेले. 

     

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

खासदार मोहन डेलकर यांचा मुंबईतील हॉटेलमध्ये आढळला मृतदेह

News Desk

अहिल्यादेवींची जयंती निमित्ताने त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी चौंडी येथे जमा

Aprna

“मुका घ्या मुका प्रकरणामध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना का अटक करत आहात?” संजय राऊतांचा सवाल

Aprna