HW News Marathi
महाराष्ट्र

चंद्रकांत पाटलांनी या प्रकरणात पडू नये, नाही तर उघडे पडाल!; राऊतांची धमकी

मुंबई | “किरीटच्या बाजुने बोलणाऱ्या भाजप नेत्यांनी या प्रकरणात पडू नये, नाही तर उघडे पडाल,” अशा धमकी वजा इशारा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना दिला आहे. राऊतांनी आज (१७ फेब्रुवारी) पत्रकार परिषदेत सोमय्यांवरी घाणाघाती हल्ला केला. भाजपचे नेते किरीट सोमय्या आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या आरोप-प्रत्यरोप सुरू आहे. नुकतेच राऊतांनी पत्रकार परिषद किरीट सोमय्या, भाजप आणि ईडीवर आरोप केले. या पत्रकार परिषदेते सोमय्यांचा उल्लेख दलाल असा केला. यानंतर राऊतांनी   गेल्या काही दिवसांपासून हे दोन्ही नेते वारंवार एकमेंकांवर आरोपाच्या फैऱ्या झाडत आहेत. 

राऊत म्हणाले, “सोमय्यांनी पवईतील पेरूबाग पुनर्वसनाच्या प्रकल्पात सुमारे ३०० ते ४०० कोटींचा घोटाळा केला आहे. या घोटाळ्याची कागदपत्रे माझ्याकडे आहेत. माझ्याकडे सोमय्यांविरोधात एक दोन नाही तर ट्रकभरून कागदपत्रे आहेत. ही सर्व कागदपत्रे ईडीकडे पाठवणार आहे. या प्रकरणासंदर्भात मी मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे. आणि ही सर्व कागदपत्रे त्यांना देणार आहे.  काही लोक किरीट सोमय्यांच्या बाजूने बोलताहेत. मात्र त्यांना मी सांगतो की, या प्रकरणामध्ये पडू नका. तुम्ही उघडे पडाल. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील वगैरे मंडळी ‘बेगानी शादीमे…”

आणि सोमय्यांच्या विरोधात माझ्याकडे आतापर्यंत २११ प्रकरणे जमा झाली आहेत. सोमयांनी अमित शहा आणि फडणवीसांच्या नवाचा वापर करून साडे सात हजार कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे. देवेंद्र फडणवीसांच्या नावाचा वापर करत लोकांकडून वसुली केल्याचा आरोप राऊतांनी केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जिथे जिथे भाजप सरकार तिथे तिथे दलित, महिला व अल्पसंख्यांकावर अत्याचार: बाळासाहेब थोरात

News Desk

अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ, आजपासूनच CBI ची विशेष टीम मुंबईत येणार

News Desk

अजित पवार पहाटे ६ वाजता ॲान फिल्ड! पुणे मेट्रो कामाचा घेतला आढावा ….

News Desk