HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यातील जीआय मानांकनाना प्रतिष्ठा मिळवून देणार! – दादाजी भुसे

पुणे । देश व राज्य पातळीवर जीआय मानांकनांना प्रतिष्ठा देण्यासाठी पणन व अपेडाला सोबत घेत कृषी विभाग काम करेल, असे प्रतिपादन कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी केले. राज्यातील 10 नव्या वाणांना मानांकन देण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले.

साखर संकुल येथे कृषी मंत्री भुसे यांनी भौगोलिक मानांकनाबाबत आढावा घेतला. यावेळी कृषी आयुक्त धीरजकुमार, उपसचिव गणेश पाटील, फलोत्पादन संचालक कैलास मोते, पणन संचालक सुनील पवार, संचालक सुभाष नागरे यांच्यासह जीआय मानांकन प्राप्त शेतकरी संघाचे अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते.

भुसे म्हणाले, राज्यातील 22 पिकांना 26 मानांकन मिळाले आहेत. 10 नवीन वाण मानांकनासाठी प्रस्तावित आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून राज्यात विकेल ते पिकेल अंतर्गत मागणी असलेला वाण शेतकऱ्यांनी पिकवावा यासाठी शासनाचा प्रयत्न आहे. जीआय भौगोलिक मानांकन प्राप्त वाणांना शासनाचे पाठबळ असणार आहे. शेतकरी बांधवांनी सुचविलेल्या काही उपाययोजनावरही लववकरच सकारात्मक निर्णय घेण्यात येईल.

जीआय मानांकन मिळालेल्या वाणांचे आता ब्रॅडींग करण्यात येणार आहे. राज्य सरकारने भोगोलिक मानांकन अर्थात जीआय मानांकन मिळालेल्या कृषी उत्पादकांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी नोंदणी, प्रचार, प्रसिद्धी व बाजारपेठ उपलब्धता अशा चार योजना तयार केल्याने त्याचा फायदा ब्रॅडींगला होणार आहे. राज्यातील अनेकांना भोगोलिक मानांकन मिळाले आहेत. या उत्पादकांच्या अधिक उत्पादनांसाठी, तसेच या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी राज्यामध्ये कृषि विभाग, पणन व अपेडा अंतर्गत कृषि उत्पादकांना मदत करण्यात येणार असल्याचेही भुसे यांनी सांगितले.

फलोत्पादन संचालक मोते यांनी राज्यातील भौगोलिक मानांकनाबाबत तर पणन संचालक पवार यांनी पणम मंडळाच्या योजनाबाबत सादरीकरण केले. राज्यातील जीआय मानांकन मिळालेल्या उत्पादक संघाचे अध्यक्षांनी संघाच्यावतीने सुरू असलेले काम, अडचणी व उपाययोजनाबाबत माहिती दिली. यावेळी कृषी, पणन, अपेडा विभागाचे प्रमुख अधिकारी तसेच शेतकरी उपस्थित होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कसारा घाटातील पुलावर गोरखपूर एक्सप्रेसचा डबा घसरला

News Desk

केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षेच्या पूर्व प्रशिक्षणाकरीता ७ जानेवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

Aprna

पुण्यात वाढदिवसाचं बेकायदा होर्डिंग लावल्याच्या प्रश्नाला उत्तर देतांना अजित पवार चांगलेच भडकले!

News Desk