HW News Marathi
महाराष्ट्र

सिंह कधीही गिधाडांच्या धमकीला घाबरत नाही; फडणवीसांचा राऊतांना टोला

मुंबई | ‘सिंह कधीही गिधाडांच्या धमकीला घाबरत नाही,’ असा टोला  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना मारली आहे. “महाराष्ट्रातील महाविकासआघाडीचे सरकार पाडण्यासाठी माझ्यावर दबाव आणला जात आहे,” असा गौप्यस्फोट राऊतांनी पराष्ट्रपती आणि राज्यसभा सभापती व्यंकय्या नायडू यांना पत्रद्वारे केला आहे. आणि या प्रकरणात उपराष्ट्रपतींनी हस्तक्षेप करावा, अशी मागणीही त्यांनी पत्रातून केली आहे. राऊतांच्या पत्रामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली. 

“सिंह कधीही गिधाडांच्या धमकीला घाबरत नाही. राऊत हे सध्या व्हिक्टिम कार्ड खेळण्याचा प्रयत्न करत आहे. राऊत हे संपादक असल्याने त्यांना चर्चेत राहण्यासाठी काय विधाने केली पाहिजेत हे त्यांना चांगले माहित आहे. आणि राऊत हे दररोज सकाळी ९ वाजता येऊन लोकांचे मनोरंजन करतात. यापेक्षा जास्त त्यांच्या बोलण्याला महत्त्व दिले जाऊ नये, राऊतांची जी काही तक्रार आहे, ती त्यांनी न्यायालयासमोर मांडावी,” असे फडणवीस गोव्यातील पत्रकार परिषदेत म्हणाले.  

माझ्या मुलीच्या लग्नाच्या वेळी फुलवाला, डेकोरेशनवाला यांना ईडीने उचलून आणले. आणि ईडीने त्यांना किती पैसे मिळाले यांची विचारणा केले होती. परंतु डेकोरेशनवाल्यांचे माझ्या कुटुंबाशी चांगले संबंध असल्याने त्यांनी पैसे घेतले नाही. परंतु, त्या डेकोरेश करणाऱ्याला बंदुकीच्या जोरावर धमकावले, ही काय दादागिरी आहे. मुंबईत फक्त दादा शिवसेनाच आहे. असे राऊतांनी आज (९ फेब्रुवारी)  उपराष्ट्रपतींनी लिहिलेल्या पत्रातून म्हटले.  

राऊतांनी पत्रा म्हटले, “महाराष्ट्रातील महाविकासआघाडीचे सरकार पाडण्यासाठी माझ्यावर दबाव आणला जात आहे. आणि महाराष्ट्रातील महाविकासआघाडीचे सरकार पाडण्यासाठी माझ्यावर दबाव आणला असून राज्यात मध्यावर्धी निवडणूक करण्यासाठी प्रसत्न करत आहे. मात्र, मी या सर्वांना नकार दिल्याचेही स्पष्ट केले आहे. ठाकरे कुटुंबिय, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न होत आहे. यासंदर्भात मी मुख्यमंत्री, महाविकासआघाडी आणि राज्यातील इतर नेत्यांशी चर्चा झाली आहे. हुकूमशाही पद्धतीने राज्य करणाऱ्यांना बद्दल बोलावे लागेल,” असे ते म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

चैत्यभूमीवर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

Aprna

पुण्यात कर्जबाजारी दाम्पत्याची आत्महत्या

swarit

राज्यमंत्री बच्चू कडूंची कबड्डीच्या मैदानात एंट्री

News Desk