HW News Marathi
देश / विदेश

…तरीही काँग्रेसचा अहंकार गेलेला नाही! – नरेंद्र मोदी

नवी दिल्ली | संसदेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आज चर्चा झाली. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (७ फेब्रुवारी) भाषण करताना काँग्रेस हल्लाबोल केला आहे. काँग्रेसला नागालँडसारख्या राज्याने २४ वर्षांपूर्वी आणि गोव्यात २८ वर्षांपूर्वी नाकारले. ही परिस्थिती आपल्याला देशातील इतर राज्यांत देखील सुरू आहे. “या राज्यात काँग्रेसचा पराभव होत असून सुद्धा काँग्रेसचा अहंकार अजूनही गेलेला नाही,” अशी टीकाही मोदींनी संसदेत केले आहे. 

दरम्यान, नागालँडने २४ वर्षापूर्वी, ओडिशामध्ये २७ वर्षांपूर्वी आणि गोव्यात २८ वर्षापूर्वी काँग्रेसचे सरकार आले होते. उत्तर प्रदेश, गुजरात, बिहारने शेवटी १९८५ मध्ये काँग्रेसला मतदान केले होते. त्याला जवळपास ३७ वर्षे झाले. पश्चिम बंगालमधील लोकांनी काँग्रेसला जवळपास ५० वर्षांपूर्वी १९७२ मध्ये निवडले होते, अशी माहिती देत मोदींनी काँग्रेसवर टीका केली. 

काँग्रेसच्या काळात १० टक्क्यांपेक्षा जास्त महागाईचा दर वाढला – मोदी

“सरकारी योजनांची रक्कम ही आता येट लाभार्थींच्या खात्यात जमा होते. तर जनतेमध्ये तुम्ही राहिला असता तर या सर्व गोष्टी तुम्हाला काळाल्या असत्या. परंतु, तुम्ही आजही २०१४मध्ये अडकलेले दिसत आहात. तसेच देशातील जनतेने तुम्हाला ओळखले आहे. यापूर्वी देशातील जनतेने तुम्हाला ५० वर्षे देश चालवण्याची संधी दिली होती, पण हे कदाचित तुम्ही विसराल असाल,” असेही मोदी यावेळी म्हणाले. काँग्रेसच्या काळात १० टक्क्यांपेक्षा जास्त महागाईचा दर वाढला होता. परंतु, २०१४ महागाईचा दर ५ टक्क्यांपेक्षा कमी राहिला होता. यावर्षी कोरोना असून देखील महागाईचा दर ५.२ टक्के राहिले आहे.

कोरोना पसरविण्यासाठी काँग्रेस जबाबदार – मोदी

“कोरोना काळात भारताने एकजुटीने काम केले. पण, या काळात काँग्रेस राजकारण करत होती, असेही ते संसदेत म्हणाले. कोरोनाच्या काळात मुंबईतील मंजुरांना यूपी आणि बिहाराल जाण्यासाठी काँग्रेसने तिकीटे पुरविली होती. त्यामुळे यूपी आणि बिहारमध्ये कोरोनाची संख्या वाढली. यामुळे कोरोना पसरविण्यासाठी काँग्रेस जबाबदार आहे,” असा हल्लाबोल मोदींने काँग्रेसवर केला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना सोडवण्यासाठी ४ केंद्रीय मंत्री जाणार, पंतप्रधानांचा निर्णय

Aprna

प्रशांत किशोर पुन्हा शरद पवारांच्या भेटीला, १५ दिवसातील ही तिसरी भेट!

News Desk

‘जैश’चा म्होरक्या अझहरला दहशतवादी घोषित करा, अमेरिका, फ्रान्ससह ब्रिटन संयुक्त राष्ट्रात प्रस्ताव 

News Desk