HW News Marathi
महाराष्ट्र

संतोष परब प्राणघातक हल्ला प्रकरण : नितेश राणे सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयासमोर शरण

मुंबई | शिवसेनेचा पदाधिकारी संतोष परब प्राणघातक हल्ला प्रकरणी भाजपचे आमदार नितेश राणे यांना सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयात शरण येणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाने नितेश राणे यांचा काल (२७ जानेवारी) अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला होता. येत्या १० दिवसात शरण येण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. यानंतर नितेश राणे आज (२८ जानेवारी) सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयात शरण येणार आहेत. 

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयात राणेंच्या याचिकेवर काल (२७ जानेवारी) सरन्यायाधीश रमण्णा, न्या. हिमा कोहली आणि न्या. ए.एस. बोपण्णा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. त्यावेळी  राणेंची सर्वोच्च न्यायालयाच्या अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला असून येत्या १० दिवसात सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयात शरण येण्याचे आदेश दिले आहेत. 

नेमके काय आहे प्रकरण

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांचे निवडणूक प्रचार प्रमुख संतोष परब यांच्यावर १८ डिसेंबर रोजी प्राणघातक हल्ला झाला. त्यांच्यावर हल्ला करणारा प्रमुख आरोपी सचिन सातपुते याला पोलिसांनी दिल्लीहून अटक केली. तसेच या प्रकरणातील एकूण सहा संशयितांना ताब्यात घेतल्यानंतर चौकशीदरम्यान नितेश राणेंचे नाव समोर आले आहे. त्यामुळे या प्रकरणी नितेश राणेंवर गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आयपीसी कलम ३०७ (हत्येचा प्रयत्न), कलम १२० (बी) (गुन्हेगारी कट रचणे), कलम ३४ (समान उद्देश) अंतर्गत गुन्हा दाखल करून आठ जणांना अटक केली आहे. दरम्यान, राणेंनी सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केला होता. यानंतर राणेंनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शरद पवारांच्या पे रोलवर राहण्यापेक्षा शिवसैनिकांच्या व्यथा मांडा, चंद्रकांत पाटलांचा राऊतांना सल्ला

News Desk

महागाईचा भडका! घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत 3 रुपये 50 पैशांची वाढ

Aprna

‘ना मराठ्यांचे आरक्षण टिकवले ना ओबीसींचे, पनवती ठाकरे सरकारला फक्त दारूबंदी उठवायला जमली’ – निलेश राणे

News Desk