HW News Marathi
महाराष्ट्र

तुम्ही शिवसेनेला संपवू शकत नाही, हा डाव तुमच्यावरच उलटेल! – संजय राऊत

मुंबई | तुम्ही शिवसेनेला संपवू शकत नाही. हा डाव तुमच्यावरच उलटेल, असा धमकी वजा इशारा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपला दिला आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्ताने काल (२३ जानेवारी) शिवसैनिकांशी संवाद साधला. यानंतर आज (२४ जानेवारी) संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना भाजपवर हल्लाबोल केला आहे.

राऊत म्हणाले, “तुम्ही खोट्या प्रकरणात तुरुंगात टाकाल, तुमचे आयटीफायटी सेल आहेत ना. त्यातून तुम्ही बदनामी कराल किंवा हरेन पंड्यांवप्रमाणे गोळी माराल. यापलिकडे दुसरे तुम्ही काय करू शकता. तुम्ही शिवसेनेला खतम करू शकत नाही. हा डाव तुमच्यावर उलटेल. जेव्हा बाबरीनंतर शिवसेना उत्तर हिंदुस्तानात बाळासाहेब ठाकरेंची लहर होती. तेव्हा आम्ही उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, आणि जम्मू-काश्मीरपर्यंत जर आम्ही निवडणुका लढविली असती. तर जसे काल उद्धव ठाकरेंनी म्हटले की, देशात आमचा पंतप्रधान झाला असता. पण, आम्ही भाजपला सर्व सोडले. आणि आम्ही महाराष्ट्रात काम करू, हे बाळासाहेब ठाकरेंचा मोठेपणा होता. ते हिंदुरुदय सम्राट होते, जर एक हिंदू पार्टी देशात मोठे होत असेल तर आम्ही कोणतीही अडचण निर्माण करणार नाही. आपण एक विचार धारेचे लोक असून तुम्ही मोठे व्हा किंवा आम्ही मोठे होऊ, कारणे विचार मोठे होतात, असे बाळासाहेब ठाकरेंचे विचार होते. 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

३१ डिसेंबर साजरा करताय? मग राज्य शासनाचे हे ‘१०’ नियम आधी पाहा! 

News Desk

#CoronaVirus : मुंबई, पुणेसह नागपूरमधील बंददरम्यान ‘या’ जीवनावश्यक सेवा सुरू राहणार

swarit

दबावतंत्र करायचं असेल तर शक्तीप्रदर्शनासाठी जागा पुरणार नाही, पंकजांचं सूचक वक्तव्य

News Desk