HW News Marathi
कृषी

नांदेड जिल्ह्यातील विविध पाणी पुरवठा प्रकल्पांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुंबईतून ई-भुमिपुजन संपन्न

उत्तम बाबळे

नांदेड :- जलस्वराज- २ तसेच मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत नांदेड जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजना, टंचाईग्रस्त गावातील टंचाई कालावधीसाठी साठवण टाक्‍या उभारणीचे प्रकल्प, पाणी गुणवत्ता बाधित गावांसाठी पाणी शुद्धीकरण संयंत्र (आरओ) उभारणीचे १७ गावातील प्रकल्पाच्या योजनांचे ई-तंत्रज्ञानाच्या आधारे ई- भुमिपुजन कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या हस्ते मुंबई येथुन १० जुलै रोजी करण्यात आले. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे वर्षा निवासस्थानातून मुख्यमंत्री फडणवीस यांनी रिमोटद्वारे या सर्व प्रकल्पांचे एकाच वेळी ई-भूमिपूजन करुन या कामांचा शुभारंभ केला.

यावेळी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता, राज्यमंत्री सदाभाऊ खोत, आमदार राजेंद्र पाटणी, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, पाणीपुरवठा विभागाचे प्रधान सचिव राजेशकुमार, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव संतोषकुमार, वर्ल्ड बँकेचे टास्क टीम लिडर राहावा निती आदी मान्यवर उपस्थित होते.

राज्य शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्यावतीने मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रम व जागतिक बॅक अर्थसाहायित जलस्वराज्य-२ योजनेतील महाराष्ट्रातील १७१ प्रकल्पांचा ई-भूमिपूजन सोहळा आयोजित करण्यात आला होता. यामध्ये नांदेड जिल्हयातील १७ गावांचा समावेश करण्यात आला आहे. पाणी गुणवता बाधीत १० गावे – किनवट तालुक्यातील- दूधगाव, यंदा, शनिवारपेठ, सिरमेटी, देगलूर- मुजळगा, धर्माबाद- रामपूर, रामेश्वर, बिलोली- कोळगाव व माहूर तालुक्यातील अंजनखेड, वाई, पाणी टंचाई ग्रस्त 5 गावे – किनवट तालुक्यातील- आमरसिंग नाईक तांडा, मुखेड- -फत्तु तांडा, मानसिंग तांडा, व लोहा- चित्रा तांडा, सोनमांजरी तांडा, व शहरालगतची पाणी पुरवठा योजना प्रकल्पातील २ गावे बिलोली तालुक्यातील अर्जापूर व सगरोळी या गावांचा ई-भुमीपुजन कार्यक्रमात समावेश करण्यात आला आहे.

या कार्यक्रमाचे थेट वेबप्रक्षेपण www.mahapani.in या संकेतस्थळावरुन करण्यात आले.ते बिलोली तालुक्यातील सगरोळी, अर्जापूर येथे करण्‍यात आले. यावेळी आमदार सुभाष साबणे, जिल्हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे, जिल्‍हा परिषद सदस्‍य लक्ष्‍मण ठक्‍करवाड, उपसभापती दत्‍तराम बोधणे, उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी जी.एल. रामोड, माहिती शिक्षण व संवाद सल्‍लागार नंदलाल लोकडे, तर नांदेड जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात दाखविण्‍यात आलेल्‍या थेट प्रसारणावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष समाधान जाधव, प्रभारी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. प्रविणकुमार घुले, उपमुख्य कार्यकारी आधिकारी व्‍ही.आर. कोंडेकर, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे कार्यकारी अभियंता एम. एस. बोडके, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता एम. एम. गायकवाड, जिल्हा वरिष्ठ भू-वैज्ञानिक श्रीमती व्ही. व्ही. सांळुके, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक मिलिंद व्यवहारे, लेखाधिकारी जी. आर. चटणे, अधिक्षक अल्‍केश शिरशेटवार, विविध गावातील सरपंच, नागरीक, कर्मचारी आदींची यावेळी उपस्थिती होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात दूध आंदोलनाला हिंसक वळण, आंदोलनकर्त्यांनी फोडल्या गाड्या

News Desk

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या दूध आंदोलनाला मध्यरात्रीपासून सुरुवात

News Desk

महाराष्ट्राला मनरेगाचे ४ पुरस्कार जाहीर

swarit