HW News Marathi
कृषी

वऱ्हाडात यंदा करावी लागणार तिबार पेरणी

अकोला : यंदा वरुणराजा विदर्भावर रुसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी दोनदा केलेली पेरणी वाया गेली असून, विशेषत: पश्चिम वऱ्हाडावर तिबार पेरणीवरही संकट घोंघावत आहे.

२५ जुलैपर्यंत सुमारे टक्क्यांवर पेरणी करण्यात आली होती. तेथील उत्पादन आता ५0 टक्के घटण्याची शक्यता वाढली आहे. पश्‍चिम विदर्भात सरासरी ३२ लाख ७५ हजार हेक्टर पेरणीचे नियोजन कृषी विभागाने केले होते. यावर्षी समाधानकारक पाऊस होईल, असे भाकीत हवामानशास्त्र विभागाने केल्याने सर्वच स्तरावर कृषी निविष्ठा ते पेरणी, असे नियोजन करण्यात आले होते. तथापि, पावसाने प्रदीर्घ दडी मारल्याने पेरण्या खोळंबल्या.

१५ जुलैपर्यंत राज्यासह विदर्भात ५0 टक्क्यांच्यावर पेरण्याची आकडेवारी सरकली नव्हती. १५ जुलैनंतर राज्यात बहुतांश ठिकाणी पाऊस पडला. विदर्भात तुरळक पावसाच्या भरवशावर शेतकर्‍यांनी आपत्कालीन पीकपेरणी केली आहे.

१५ जुलैपर्यंत कापूस, तूर, सोयाबीन पिकाच्या पेरणीची ही वेळ होती; परंतु शेतकर्‍यांनी २५ ते २७ जुलैपर्यंत पेरणी केली. त्यामुळेच १५ जुलैनंतर ७ ते १0 दिवसांत ४0 ते ४५ टक्के पेरणी झाली आहे. पश्‍चिम विदर्भात पेरणीचा आकडा आजमितीस ९२ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. पण तेव्हापासून पावसाने दांडी मारल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे. तापमान वाढल्याने पिके कोमेजली आहेत. उशिरा पेरणी केलेली पिके ही दोन पानांवर आहेत. तापमानाचा मार सहन होत नसल्याने या पिकांनी माना टाकल्या आहेत.

कोट

१५ जुलैनंतर पेरणी केल्यास उत्पादनात ५0 टक्के घट येते, हे सूत्रच आहे. आठ दिवस पाऊस लांबल्यास १0 टक्के उत्पादनात घट होते, तसेच २0 ते २५ दिवस लांबल्यास ४0 टक्क्यांवर घट होत असते. काही पिकात ही घट ३0 ते ४0 टक्के असते.

डॉ. दिलीप एम. मानकर,

संचालक (संशोधन), डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शेतकरी संपाचा दुसरा दिवस, भाज्यांचे भाव गगनाला भिडणार

News Desk

राज्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन चिघळले

News Desk

नांदेड जिल्ह्यात शेतकरी पीक कर्ज माफीचे ऑनलाईन अर्ज सूरू

News Desk