HW News Marathi
अर्थसंकल्प

#Budget2019 : LIVE Updates अंतरिम बजेटमध्ये सामान्यांसाठी विशेष काय ?

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या काळातील शेवटचे अंतरिम बजेट पीयूष गोयल आज (१ फेब्रुवारी) सकाळी ११ वाजता संसदेत मांडणार आहेत. निवडणुका तोंडावर असल्याने संपूर्ण देशाच्या नजरा अर्थसंकल्पाकडे लागल्या आहेत. या अंतरिम बजेटमध्ये शेतकरी आणि मध्यमवर्गीयांसाठी मोठ्या घोषणा करण्यात येण्याची शक्यता आहे.

LIVE Updates

  • “एक पाव रखता हू… हजारो राहे फूट पडती है” म्हणत अर्थमंत्री पियुष गोयल यांनी केली

    मोदी सरकारच्या शेवटच्या अर्थसंकल्पाची सांगता

  • हा अर्थसंकल्प म्हणजे देशाची विकासयात्रा, असे म्हणत अर्थमंत्री पियुष गोयल यांनी जाहीर केला अंतरिम अर्थसंकल्प
  • दरमहा ५००० रुपये उत्पन्न असणाऱ्यांना कोणताही कर लागू होणार नाही
  • शैक्षणिक कर्जावर, घरांवर त्याचप्रमाणे बाकी कर्जांवर कोणताही कर लागू होणार नाही
  • सामाजिक आणि अन्य क्षेत्रात प्रगती. बांधकाम, आरोग्य, रस्ते विभागात प्रगती
  • वैद्यानिक दृष्टीने संस्थांची निर्मिती आणि प्रगती
  • डिजिटल इंडियामुळे सर्व क्षेत्रांमध्ये प्रगती. २०३०मध्ये भारत म्हणजे प्रत्येक क्षेत्रात प्रगती.
  • आपला भारत हा विद्युत वाहनावर काम करेल.
  • भरपूर रोजगार निर्माण करण्याचा प्रयत्न
  • नद्यांची स्वच्छता हे आमचे मूळ ध्येय असणार
  • भारताचा अंतराळवीर अवकाशात पाठविणार, नवी अवकाश मोहीम
  • निरोगी आणि रोगमुक्त भारत
  • २०३० पर्यंत चिंतामुक्त भारत
  • भारताचा अंतराळवीर अवकाशात पाठविणार, नवी अवकाश मोहीम रत बनवायचा आहे
  • महिलांना समान अधिकार, सुरक्षा देणार
  • आयकर सूट मर्यादा अडीच लाखांवरुन ५ लाखांवर, सरकारचा अत्यंत मोठा निर्णय

  • देशातील सर्वसामान्य करदात्यांना अत्यंत मोठा दिलासा
  • संपूर्ण जगाच्या तुलनेत भारतात सर्वात स्वस्त इंटरनेट सुविधा उपलब्ध
  • ग्रॅच्युटीची मर्यादा १० लाखांवरुन २० लाखांवर
  • जीएसटी परिषद घेणार नव्या घरांचा जीएसटी कमी करण्याचा निर्णय

  • आयकर स्लॅबमध्ये कोणताही बदल नाही
  • जीएसटीमध्ये कोणतेही बदल नाहीत
  • लघुद्योगांसाठी ६ टक्के जीएसटी
  • केंद्राकडून जीएसटीमधील १४ टक्के कर हा राज्यांना दिला जाणार
  • भ्रष्टाचारविरोधी कारवायांमधून १,३०,००० कोटी कर वसुली
  • सध्या आयकर विभाग ऑनलाईन
  • पुढील २ वर्षात आयकरसंबंधी सर्व गोष्टी कॉम्पुटरवर होतील
  • मध्यमवर्गीयांचा आयकर कमी करणे हे आमच्या सरकारचे प्रथम प्राधान्य
  • सरकारने मागील काळातील ८० सी अंतर्गत योजना ४ वर्षात राबवल्या
  • लघुद्योगांमध्ये वाढ होण्यास मदत
  • चित्रपटांसाठी फक्त १२ टक्के कर
  • घरांवरील कर कमी करण्यासाठी जीएसटी विभागाकडे एका शिस्तमंडळातर्फे अहवाल देणार
  • भारतात मोबाइल वापरणाऱ्यांची संख्या सर्वाधिक
  • ५ वर्षात मोबाइल डेटाचा वापर ५० टक्क्याने वाढला
  • ५ विमान प्रवाश्य़ांची संख्या दुप्पटीने वाढली
  • येत्या ५ वर्षात १ लाख गावांना डिजिटल करण्यासाठी प्रयत्न
  • गावे देखील डिजिटली विकसित केली जातील
  • पायरसीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न केले जातील
  • मनोरंजन क्षेत्राविषयी बोलताना ‘उरी’चा उल्लेख
  • मनरेगासाठी ६० हजार कोटी रुपयांची तरतूद
  • जवानांकरिता ३५००० कोटींची तरतूद

  • सेमी वंदे भारत या हायस्पीड रेल्वेमुळे रेल्वेला गती मिळेल
  • रेल्वेसाठी ६४,५०० कोटींची तरतूद
  • दररोज देशात २७ किलोमीटरचे रस्ते बांधले जातात
  • संरक्षण खात्यासाठी ३ लाख कोटींहून अधिक तरतूद
  • ४० वर्षांपासून रखडलेली वन रँक वन पेन्शन योजना लागू
  • जवानांसाठी वन रँक वन पेन्शन योजना लागू
  • गर्भवती महिलांसाठी २६ आठवडे भरपगारी मात्तृत्व रजा
  • उज्ज्वला योजनेंतर्गत ६ कोटी
  • मुद्रा योजनेत १५ लाख कोटींचे कर्ज वाटप

  • असंघटीत कामगारांसाठी सरकारची श्रमयोगी योजना
  • १० कोटी असंघटीत कामगारांना होणार फायदा

  • किमान मासिक ३००० मासिक वेतन मिळणार
  • २१००० पगार असलेल्या कामगारांना मिळणार बोनस
  • असंघटित कामगारांना ३००० मासिक बोनस
  • असंघटीत कामगारांसाठी महत्वाची घोषणा
  • मेघ पेन्शन योजना जाहीर
  • स्वतंत्र फिशरी विभाग स्थापन केले जाणार आहे
  • कामधेनू योजनेसाठी ७५० कोटी खर्च करणार सरकार
  • २१ हजार पगार असलेल्या असंघटीत कामगारांना ७ हजार बोनस मिळणार
  • १० कोटी असंघटीत कामगारांना य़ोजनेचा लाभ
  • गाईच्या प्रजाती सुधारण्यासाठी योजना

  • नोकरीदऱ्याम्यान मृत्यू झाल्यास आर्थिक मदत अडीच लाखावरुन ६ लाख केली
  • पशुसंवर्धनासाठी किसान क्रेडिट कार्ड
  • पशुसंवर्धन, मत्स्यपालनासाठी कर्जात २ % सूट
  • गोमातेच्या संवर्धनासाठी कामधेनू योजना
  • अल्प भूधारक शेतकऱ्यांना मोदी सरकारची मोठी मदत
  • ५ एकरपर्यंत शेतजमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना दरमहा ५०० रुपयांची मदत
  • किसान सन्मान निधी योजनेची सुरुवात, लवकरच शेतऱ्यांच्या खात्यात जमा होणार पैसे
  • एकूण २२ पिकांचा हमीभाव वाढ, हे यापूर्वी कधीही झाले नाही
  • शेतकऱ्यांसाठी ‘पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना’
  • अंबलबजावणी २०१८ डिसेंबरपासून, पहिला २००० चा हफ्ता लवकरच खात्यात जमा होणार

  • देशातील १२ कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार

  • २ एकर शेतजमीन असणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दर वर्षाला ६००० रुपये जमा होणार
  • २०२१ पर्यंत देशातील प्रत्येक घरात वीज पोहोचवण्याचा संकल्प
  • मागास राहिलेल्या ११५ जिल्ह्यांच्या विकासावर भर देणार
  • देशात एकूण २१ एम्स कार्यरत, हरियाणात २२वे एम्स बांधणार.
  • आयुष्यमान योजनेमुळे गरिबांचे ३ हजार कोटी रुपये वाचले
  • प्रधानमंत्री आवास योजनेद्वारे १ लाख ५३ हजार घरे बनविण्यात आली
  • स्वस्त धान्यासाठी १ लाख ७० हजार कोटींची तरतूद
  • मनरेगासाठी मोठे अर्थसाहाय्य
  • आम्ही लोकांच्या विश्वासास खरे उतरले
  • जीएसटीमुळे देशाचे आर्थिक आरोग्य सुदृढ बनले
  • पूर्वीच्या तुलनेत राज्यांना १० % अधिक निधी मिळण्यास सुरुवात
  • सकारात्मक योजनांमुळे मोठी परकीय गुंतवणूक
  • सरकारचा तोटा ६ टक्क्यांवरून २.५ टक्क्यांवर
  • २०२० पर्यंत सर्वांना स्वतःचे घर तर शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट होणार
  • भारत पुन्हा एकदा प्रगतीच्या वाटेवर
  • महागाईवर नियंत्रण मिळवण्यास केंद्र सरकारला मोठे यश
  • देशातून घराणेशाही, भ्रष्टाचार आम्ही दूर केला
  • आमच्या सरकारने देशाचा आत्मविश्वास वाढवला
  • अरुण जेटली यांच्या उत्तम प्रकृतीसाठी पियुष गोयल यांनी दिल्या शुभेच्छा
  • संसदेत अर्थमंत्री पियुष गोयल यांची अर्थसंकल्प मांडण्यास सुरुवात
  • निवडणुकांपूर्वी सादर होणार हा अर्थसंकल्प असल्याने लोकप्रिय घोषणांची शक्यता

  • केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज, राजनाथ सिंह आणि रविशंकर प्रसाद संसदेत दाखल
  • केंद्रीय मंत्री मंडळाची अर्थसंकल्पाला मंजुरी
  • अर्थमंत्री पियुष गोयल थोड्याच वेळात अर्थसंकल्प सादर करणार
  • मंत्रिमंडळ बैठकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत दाखल
  • अंतरिम बजेटची प्रत कडेकोट बंदोबस्तात संसदेत दाखल
  • थोड्याच वेळात पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक
  • राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची अर्थसंकल्पाला मंजुरी

  • अर्थमंत्री पियुष गोयल बजेट ब्रिफकेससह संसदेत दाखल
  • अंतरिम बजेट मांडण्याआधी केंद्रीय मंत्री मंडळाची बैठक

  • अर्थमंत्री पियुष गोयल सकाळी ११ वाजता संसद सभागृहात अर्थसंकल्प सादर करणार.
  • अर्थमंत्री पियुष गोयल अर्थमंत्रालयात दाखल.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

PFB : मोदी सरकारच्या ५ वर्षातील अर्थसंकल्पाचा लेखाजोखा

News Desk

Budget 2019 : २० रुपयांचे नवे नाणे, तर १ ते १० रुपयांचे नाणे नव्या रुपात येणार

News Desk

#Budget2019 : हा मोदी सरकारचा अर्थसंकल्प कि मतसंकल्प ? जाणून घ्या

News Desk