HW News Marathi
मनोरंजन

बालदिना निमित्त गुगलचे खास डुडल

नवी दिल्ली | गुगल हे नेहमीच सण, आंतरराष्ट्रीय दिन आणि महान व्यक्तींवर खास डुडल तयार करून त्यांच्या कामाला सलाम करत असते. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांचा जन्मदिवस हा बालदिन म्हणून साजरा केला. यानिमित्ताने गुगलने बच्चे कंपनीला डुडलच्या माध्यमातून खास शुभेच्छा दिल्या आहेत. गूगलच्या डूडलमध्ये बालकांमधील संशोधकजिज्ञासू वृत्ती दाखवली आहे. यात एक मुलगी टेलिस्‍कोपद्वारे अंतराळात बघत आहे. तिला ग्रह, आकाशगंगा आणि अवकाशयान दिसत आहे.

बालदिनी बनविण्यात आलेले गुगलचे हे खास मराठी मुलीने बनविले आहे. गुगल डुडलच्या राष्ट्रीय स्पर्धेची विजेती ठरलेल्या पिंगला राहुल मोरे या विद्यार्थिनीने हे डुडल साकारले आहे. गुगलच्या वतीने स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेत ‘मला प्रेरणा देणारी गोष्ट’ हा विषय डुडल बनवण्यासाठी देण्यात आला होता. देशभरातील तब्बल ७५ हजार विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले होते.त्या विद्यार्थ्यांपैकी मुंबईतील जे.बी वाच्छा शाळेत शिकणाऱ्या पिंगला राहुल मोरे या विद्यार्थिनीने प्रथम पारितोषिक पटकावले आणि तिने साकारलेले डुडल गुगलच्या होमपेजवर बालदिनानिमित्त झळकले आहे.

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

राज ठाकरे यांची कन्या बॉलवूडमध्ये!

News Desk

एसटीएफने ऊधळला सलमानच्या हत्येचा कट

News Desk

आज संगीतकार वसंत देसाईंचा स्मृतिदिन

News Desk
महाराष्ट्र

अंघोळीची गोळी संस्थेला ‘दिव्यरत्न राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर

Gauri Tilekar

पुणे | दिव्या फाऊंडेशन, बुलढाणा यांच्या वतीने महाराष्ट्रामध्ये विविध क्षेत्रात समाजभान जपणाऱ्या तरुणाईला दिव्यरत्न राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार देण्यात येत असतो. प्रेम, बंधुभाव, त्याग आणि बचत ही तत्व स्वीकारून पुण्यातील अंघोळीची गोळी ही संस्था पाणी बचत आणि वृक्ष संवर्धन या विषयावर सातत्याने काम करत आहे. याच कामांची दखल घेत दिव्या फाऊंडेशन, बुलडाणा यांच्या वतीने देण्यात येणारा दिव्यरत्न राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार यावर्षी ‘अंघोळीची गोळी’ संस्थेला नुकताच जाहीर झाला आहे. महाराष्ट्रातील पाणी बचत आणि वृक्ष संवर्धन करणाऱ्या या तरूणाईचा होणार गौरव होणार आहे.

झाडांना देखील संवेदना असतात त्यामुळे झाडांना ठोकले जाणारे बॅनर, पोस्टर आणि खिळे काढण्याची अनोखी मोहीम अंघोळीची गोळी या संस्थेने सुरु केली होती. अगदी अल्पावधीतच ही मोहीम व्यापक पद्धतीने महाराष्ट्रभर पसरली होती. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात विविध सामाजिक संस्था आणि युवकांच्या गटांच्या मदतीने खिळेमुक्त झाडे ही मोहीम आज सुरु आहे. पुण्याच्या माधव पाटील यांनी सुरु केलेली अंघोळीची गोळी ही संस्था सध्या प्रेम, बंधुभाव, त्याग आणि बचत या तत्वांचा प्रसार करून पाणी बचत आणि वृक्ष संवर्धनासाठी काम करत आहे.

“पुरस्कार मिळाल्याचा आनंद नक्कीच आहे मात्र पर्यावरण संवर्धनाच्या कामात सर्वसामान्य जनतेने उतरणे अत्यंत आवश्यक आहे. पण त्याचबरोबर पर्यावरणपुरक जीवनशैलीचा अंगिकार करणे ही देखील प्रत्येकाची जबाबदारी आहे,” असे मुंबईच्याअंघोळीची गोळी टीम म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरांवर १ जानेवारी हा दिवस अंघोळीची गोळी म्हणजेच पाणी बचत करण्याचा दिवस म्हणुन साजरा व्हावा यांसाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, असेही संस्थेच्या वतीने सांगण्यात आले.

Related posts

१०० % उपस्थितीती अनिवार्य असणाऱ्या कार्यालयामध्ये दिव्यांग अधिकारी, कर्मचाऱ्यांना कार्यालयात उपस्थित राहण्यास सूट

News Desk

अत्याचारांना जागीच प्रतिबंध करणाऱ्या ‘निर्भया’ पथकांमुळे महिला सुरक्षिततेला अधिक बळकटी! – उद्धव ठाकरे

Aprna

माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या पत्नी अनघा जोशी कालवश

News Desk