HW News Marathi
Covid-19

५५ वर्षांवरील पोलीस कर्मचाऱ्यांसाठी ‘वर्क फ्रॉम होम’! – दिलीप वळसे पाटील

मुंबई |  राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढ जात असताना मुंबई पोलिसांनाही या संकटाचा सामना करावा लागत आहे. एकीकडे लोकांना विनाकारण घराबाहेर न पडण्याचं आवाहन केलं जात असताना मुंबई पोलिसांना मात्र २४ तास कर्तव्यावर हजर राहावं लागत आहे. यामुळेच त्यांना करोनाचा संसर्ग होण्याची भीती जास्त आहे. मुंबईत गेल्या २४ तासात ७१ पोलिसांना करोनाची लागण झाली आहे.

दरम्यान राज्याचा गृहविभागाने पोलिसांसाठी मोठा निर्णय घेतला असून त्यांनाही खासगी कंपनीतील कर्मचाऱ्यांप्रमाणे ‘वर्क फ्रॉम होम’ करता येणार आहे. पोलिसांना करोनाची लागण होत असल्याने आता ५५ वर्षांवरील पोलिसांना ‘वर्क फ्रॉम होम’चा आदेश देण्यात आला आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली.

ते म्हणाले की “आपण ५५ वर्षांवरील पोलीस कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमचा आदेश दिला आहे. त्यांनी कर्तव्यावर न येता घरुन काम करायचं आहे”. तसंच पोलिसांसाठी वैद्यकीय व्यवस्था तयार असल्याचंही त्यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी राज्यातील निर्बंधांबाबत काही अतिरिक्त माहिती देण्यास नकार दिला. राज्यात आतापर्यंत ९५१० पोलिसांना करोनाची लागण झाली असून १२३ जणांचा मृत्यू झाला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

HW Exclusive : अमोल मिटकरींची अजित पवार-शरद पवार यांच्याशी पहिली भेट कशी झाली

News Desk

अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असलेल्या प्रयोगशाळेच्या उद्घाटनाचे मुख्यमंत्र्यांना निमंत्रण  

News Desk

वैद्यकीय शिक्षण विभागाच्या परीक्षा १५ जुलैपासून सुरू होणार !

News Desk