HW News Marathi
Covid-19

HW Exclusive : अमोल मिटकरींची अजित पवार-शरद पवार यांच्याशी पहिली भेट कशी झाली

मुंबई | फक्त दोन भेटीत शरद पवार यांनी मला पुढच्या १० वर्षाचे बळ दिले आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी एच. डब्ल्यू. मराठीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले. यावेळी अमोल मिटकरी यांनी त्यांच्या राजकीय प्रवास कसा सुरू झाला. राष्ट्रवादी पक्षात का?, प्रवेश केला, आदी गोष्टींबद्दल त्यांनी एच. डब्ल्यू. मराठीला दिलेल्या मुलाखतीत सर्व प्रश्नाची उत्तर त्यांनी दिले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेट कशी झाली, बद्दल त्यांनी सविस्तररित्या एच. डब्ल्यू. मराठीशी बोलताना सांगितले आहे.

अमोल मिटकरी यांची अजित पवार यांची भेट कधी व कशी झालीया प्रश्नावर बोलताना ते म्हणाले, “व्याख्यानाचा माझ्या प्रवास सुरू असताना ६ मे २०१९च्या शारदा व्याख्यानमाला येथील कार्यक्रमाचे उद्घाटनला राष्ट्रवादीचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आले होते. माझे व्याख्यान ऐकण्यासाठी ते स्वत: प्रेक्षकांमध्ये बसले होते. हे व्याख्यान ऐकल्यानंतर न भेटता निघून घेल्यावर माझ्या मानात प्रश्न उभे राहिले की, दादाना हे भाषण आवडले का?, यानंतर मी अजित पवार यांनी मसेज केला होता, की तुम्हाला माझे भाषण आवडले की नाही. माझ्या मसेजला अजित पवार यांनी रिप्लाय दिला. यानंतर मी अजित पवार मला फोन केला. ते माझ्याशी फोनवर बोलताना म्हणाले, मुंबईला आले की भेटायला या, असे म्हणाले. त्यानंतर मी अखेर मुंबईला धनंजय मुंडे यांच्या मुंबईतील बी ४ बंगल्यावर अजित पवार यांना भेटायला गेलो. यानंतर मी त्यांना पक्षा येण्याची इच्छा व्यक्ती केली. भाजप हे राज्यातील जनतेला चुकीचे मार्गदर्शन करत आहे. तर मला याबद्दल बोलायला तुम्ही मला पक्षात एक संधी द्यावी, अशी इच्छा मी अजित पवार यांनी बोलून दाखवली,” आमदार अमोल मिटकरी यांनी एच. डब्ल्यू. मराठीला दिलेल्या मुलाखत दिली आहे.

त्यावेळी मी अजित पवार यांना म्हटलो की, मला कोणत्या मतदारसंघात उभा राहणार नाही. फक्त संघ विचारसरणी महाराष्ट्राला चुकीचे मार्गदर्शन करत आहे. आणि त्याविरोधात मला बोलायला एक संधी द्या, आणि मला साजेसे पद द्यावे. त्यावेळी शिवनेरी येथे अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे या दोघांच्या संकल्पनेतून शिवस्वराज्य यात्रा सुरू झाली. शिवस्वराज यात्रेमध्ये खासदार अमोल कोल्हे यांच्या सोबत भाषण देण्याची संधी मिळाली. यानंतर लोकांना माझी भाषण आवडले आणि सभामध्ये बोलण्याची संधी मिळाली, असे अमोल मिटकरी यांनी एच. डब्ल्यू. मराठीशी बोलताना सांगितले.

राष्ट्रवादीपक्षातून अनेक लोक पक्ष सोडून गेली. यावेळी ठरवले की, हीच योग्य वेळ आहे. योगायोगाने अजित पवार यांनी स्टार प्रचारकांच्या यादी आणले. यानंतर अमोल कोल्हे आणि मी मिळून भाषणांनी सभा काढल्या. शेवटी साताऱ्याच्या शेवट्या सभेत शरद पवार यांच्या भाषणांने राज्यात महाविकसाआघाडीचे सरकार आले. यानंतर विधानपरिषदेच्या एका जागेवर मझ्यासारख्या एका छोट्या व्यक्तीला अजित पवार आणि शरद पवार यांनी काल (१८ मे) विधानपरिषदेच्या सदस्तवाची शपथ घेतली, असे त्यांनी एच. डब्ल्यू. मराठीशी बोलताना सांगितले.

फक्त दोन भेटीत शरद पवार यांनी मला पुढच्या १० वर्षाचे बळ

राष्ट्रवादी काँग्रसेचे अध्यक्ष शरद पवार यांचे आत्मचरित्र वाचले होते. पण प्रत्येक्षात मी त्यांना कधी भेटलो नव्हतो. जेव्हा मी मुंबई वाय. बी. सेंटरला येईजो तेव्हा मी शरद पवार यांनी ओझरते पाहत होतो. ३१ जानेवारी २०२० माझी शरद पवा यांची पहिली भेट झाली. माझे पुण्यातील व्याख्यान रद्द झाले होते. तेव्हा योगायोगाने शरद पवार हे पुण्यात होते तेव्हा मी धाडस करून मोदी बाग ठिकाणी भेटण्यासाठी गेलो. मी २० मिनिटे शरद पवार यांच्यासोबत बसलो. २०१५ पासून मी शरद पवार यांचे साहित्य वाचतो आहे. यानंतर पाच वर्षानंतर मी पहिल्यांदा त्यांना भेटलो. मुंबईतील शरद पवार यांचे सिल्व्हर ओक या त्यांच्या निवसस्थानी त्यांनी मला १३ मेला त्यांनी बोलवले होते. यावेळी कोरोना आणि पश्चिम विदर्भावर येथे राष्ट्रवादीचा ताकद कशी वाढेल यांच्या चर्चेसाठी त्यांनी भेटलो. यावेळी जवळपास सव्वातास त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केले. दो दिवस आहे माझ्या आयुष्यातील सुवर्ण योग असल्याचे अमोल मिटकरी यांनी एच. डब्ल्यू. मराठीशी बोलतांना सांगितले. तब्बल सव्वातास शरद पवार यांच्यासमोर कोविड -१९ आणि शेती याविषयावर बसून बोलो. फक्त दोन भेटीत शरद पवार यांनी मला पुढच्या १० वर्षाचे बळ दिले आहे. कतृत्व आणि कार्यजर केले तर निश्चित शरद पवार त्यांच्यावर प्रेम करतात.

१२ वर्षभरापासून व्याख्यानांच्या माध्यमातून महाराष्ट्राशी नाळ जोडली

अमोल मिटकरी यांच्या राजकीय प्रवास हा गेल्या वर्षपासून सुरू झाला असला तर त्यामागे १२ वर्षाची सामाजिक पार्श्वभूमी असल्याचे त्यांनी एच. डब्ल्यू. मराठीशी बोलतना सांगितले. गेल्या १२ वर्षभरापासून व्याख्यानांच्या माध्यमातून महाराष्ट्राशी नाळ जोडली गेली आहे, असे त्यांनी सांगितले. गेल्या पाच वर्षाच भाजपने महाराष्ट्रातील जनतेचे चुकीचे मार्गदर्शन केले. याबद्दल आपण कुठे तरी बोले पाहिजे असे माझे मन मला सांगत होते. मी महात्मा फुले. राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारधारा माणारा माणूस आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नाही, सुक्षित बेरोजगारी कमी झालेली नाही, शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहे. शाळा, शैक्षणिक आदी प्रश्न ऐरणीवर आहेत. भाजपचे अपयशाला दाखवण्या करता माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजनादेश यात्रा त्यांनी महराष्ट्रा सुरू केली होती. या यात्रेतून फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे राज्यातील जनतेला चुकीचा संदेश देत होते. याविरोधात आपण आवज उठवला पाहिजे असे मला कुठे तरी वाट होते, असे अमोल मिटकरी यांनी एच. डब्ल्यू. मराठीशी बोलताना सांगितले.

संपूर्ण मुलाखत पाहा

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उस्मानाबादमध्ये ओमायक्रॉनचे दोन रुग्ण; जिल्ह्यात भीतीचे वातावरण

News Desk

राज्यात १,२०६ पोलिसांना कोरोनाची लागण, ११ जणांचा मृत्यू

News Desk

लोकल सेवेबाबत आठवडाभरात निर्णय घ्या! अन्यथा आंदोलनाचा भाजपचा इशारा

News Desk