HW News Marathi
Covid-19

कोरोना रुग्णाला खाजगी रुग्णालयांमध्ये दाखल करण्यास BMC ची परवानगी आवश्यक!

मुंबई | देशातील कोरोना रुग्णसंख्या पुन्हा एकदा वाढत असल्याचं चित्र आहे. तर राज्यात सर्वाधिक रुग्ण हे मुंबईत सापडत आहेत. या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेने खासगी रुग्णालयांसाठी नवीन गाईडलाईन जारी केली आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला सुरुवात झाल्याने रुग्णसंख्येला नियंत्रण घालण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. तर दुसऱ्या लाटेप्रमाणेच महानगरपालिकेची परवानगी घेतल्याशिवाय कोरोना रुग्णाला खाजगी रुग्णालयांमध्ये दाखल करू नये, अशा सूचना प्रशासनाकडून रुग्णालयांना देण्यात आल्या आहेत.

महानगरपालिकेने म्हटले आहे की, बेडची कमतरता भासू नये यासाठी रुग्णालयात ८० टक्के कोविड बेडची उपलब्धता असावी. हे वार्ड रुम आरक्षित राहतील. तसेच सर्व खासगी रुग्णालयांना कोणत्याही कोविड रुग्णाला भरती करण्याआधी पालिकेची परवानगी घेणे बंधनकारक असेल. पालिकेच्या परवानगीशिवाय कोणीच खासगी रुग्णालयात दाखल होऊ शकत नाही. शिवाय खासगी रुग्णालयांनी रुग्णांकडून सरकारने निर्देशित केलेले दर आकारणं बंधनकारक असणार आहे. त्याचबरोबर रुग्णांसाठी आयसीयू वॉर्ड सज्ज ठेवण्याच्या सूचनाही पालिकेने खासगी रुग्णालयांना दिल्या आहेत.

इमारत सील करण्याच्या नियमांत बदल

मुंबईतील कोरोना आणि ओमायक्रानचे रुग्ण हे झोपडपट्टी परिसरापेक्षा इमारतींमध्ये अधिक आढळून आले आहेत. त्यामुळे पालिकेने इमारत सील करण्याच्या नियमांमध्येही याआधी बदल केले आहेत. या नव्या नियमानुसार एखाद्या इमारतीच्या विंग, कॉम्प्लेक्स किंवा सोसायटीच्या २० टक्के नागरिक कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यास संपूर्ण इमारत सील करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. तसेच एखाद्या मजल्यावर एक रुग्ण आढळल्यास संपूर्ण मजला १४ दिवसांसाठी सील केला जाईल. तसेच रुग्णाला १० दिवस विलगीकरणात राहावे लागणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राष्ट्रपती शासन लागुकरण्याची मागणी करणाऱ्या नेत्यांनो “महाराष्ट्र झोपला आहे” असे समजू नका !

News Desk

खतांच्या वाढत्या किमती विरोधात बच्चू कडू करणार टाळी आणि थाली बजाओ आंदोलन !

News Desk

5 नवे कोव्हिड सेंटर, 70 टक्के ऑक्सिजनयुक्त बेड, तिसऱ्या लाटेसाठी मुंबई पालिका सज्ज

News Desk