HW News Marathi
Covid-19

२० टक्के कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यास इमारत होणार सील; मुंबई महानगरपालिकेचा निर्णय

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून राज्यासह संपूर्ण देशात कोरोनाचा आकडा पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. मुंबईतही कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. कोरोना आणि ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुंबईतील एखाद्या इमारतीत २० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यास ती इमारत सील करण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतला आहे.

कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर मुंबईत पुन्हा एकदा कडक निर्बंध लागू केले जात आहेत. याआधी इमारतीत किंवा विंगमध्ये १० पेक्षा अधिक रुग्ण आढळल्यास इमारत सील करण्यात येत होती. परंतु, आता इमारत करण्याबाबतच्या निर्णयात सुधारणा केली आहे. आता मुंबईतील रहिवासी इमारतीच्या एकूण क्षमतेपैकी २० टक्के नागरिक कोरोनाबाधित आढळून आल्यास संपूर्ण इमारत किंवा विंग सील करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. तसेच बाधीत व्यक्तीमध्ये कोरोना सदृश लक्षणे आढळल्यास संबंधितांना १० दिवस विलगीकरणात राहावे लागणार आहे.

नव्या नियमावलीनुसार, एखाद्या इमारतीच्या मजल्यावर एक कोरोना रुग्ण आढळला तर संपूर्ण मजला १४ दिवसांसाठी सील केला जाईल. तर १० व त्यापेक्षा अधिक रुग्ण आढळल्यास संपूर्ण इमारत सील केली जाणार आहे. तसेच अशा इमारतींमधील रहिवाशांच्या चाचण्या पूर्ण होईपर्यंत बंद इमारतीचे दरवाजे उघडता येणार नाहीत. शिवाय बाधित रुग्णांच्या हायरिस्क कॉन्टॅक्टमध्ये असणाऱ्या नागरिकांनी ७ दिवस विलगीकरणात राहावं लागणार असून पाच ते सात दिवसांच्या आत कोरोना चाचणी करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात आज ११ हजारांहून अधिक ‘कोरोनामुक्त’

News Desk

लोकांचा आवाज दाबण्याची ही केंद्रातील भाजप सरकारची कायरता आहे!

News Desk

मलिकांनी ॲानलाईन बकरा खरेदी केला आहे का ? बकरी ईदवरून राजकारण तापलं !

News Desk