HW News Marathi
Covid-19

देशात गेल्या २४ तासांत कोरोनाचे २ लाख ३४ हजार २८१ नवीन रुग्ण, तर ८९३ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली। गेल्या २४ तासांत देशात २ लाख ३४ हजार २८१ नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर ८९३ जणांनी कोरोना मुळे आपले प्राण गमवावे लागले. सध्या देशात १८ लाख ८४ हजार ९३७ वर येवून पोहोचली आहे.  यानंतर आता देशात कोरोनाबाधितांची संख्या तीन कोटींवर येवून पोहोचली आहे. तर सध्या देशातील दैनंदिन पॉझिटिव्ह रेट हा १४.५० टक्यांवर येऊन पोहोचला आहे. आता देशात ४ कोटी १० लाख ९२ हजार ५२२ सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या आहे. तसेच देशात आतापर्यंत ४ लाख ९४ हजार ९१ लोकांनी कोरोनामुळे जीव गमावला आहे.

दरम्यान, केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र,तामिळनाडू आणि गुजरातमध्ये देशातील या पाच राज्यात कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. या राज्यात ६३.३१ टक्के कोरोना रुग्णांची संख्या आहे. सध्या देशाचार रिकव्हरी रेट हा ९४.२१ टक्क्यांवर आहे. आतापर्यंत देशात लसीकरण मोहिते अंतर्गत आतापर्यंत १६५ कोटीपेक्षा अधिक नागरिकांनी लसीचे दोन डोस घेतले आहे. तर देशात काल (२९ जानेवारी) १६५ कोटी ७० लाख ६० हजार ६९२ नागरिकांनी लसीचे डोस दिले आहेत.   

महाराष्ट्रात काल (२९ जानेवारी) २७ हजार ९७१ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून ६१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर गेल्या २४ तासांत ५० हजार १४२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत ७२ लाख ९२ हजार ७९१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात काल ओमायक्रॉन व्हेरियंटे ८५ रुग्णांची नोंद झाली असून यात सर्वाधिक ओमायक्रॉन रुग्णांची संख्या म्हणजे ४४ रुग्ण हे एकट्या पुणे शहरात नोंदविली आहे. राज्यात आतापर्यंत ओमायक्रॉन रुग्णांची संख्या ३ हजार १२५ ऐवढी आहे. तर १ हजार ६७४ ओमायक्रॉन रुग्ण बरे झाले आहेत. 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘कोरोना किलर ‘ इलेक्ट्रॉनिक उपकरणास आयसीएमआर,एन आय व्ही कडून कार्यक्षमता प्रमाणपत्र

News Desk

‘लॉकडाऊन’नंतर सरकारकडे काय योजना आहे? कोरोनाच्या तिरडीवरून उठण्याआधीच उत्तर जनतेला मिळावे!

News Desk

कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेत सर्वांनी सतर्कता बाळगावी! – डॉ. भारती पवार

Aprna