HW News Marathi
Covid-19

राज्यात आज कोरोनाचे ३३९० नवीन रुग्णांची नोंद, तर १६३२ रुग्णांना घरी सोडले

मुंबई। राज्यात आज ३ हजार ३९० नवीन रुग्णांचे निदान झाले असून कोरोनामुळे १२० जणांचा मृत्यू झाला आहे. आज (१४ जून)१६३२ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहे. राज्यात आतापर्यंत एकूण ५०,९७८ जण झाले करोनामुक्त झाले आहे. आता राज्यातील एकूण रुग्णसंख्या आता १ लाख ७ हजार ९५८ इतकी झाली आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

 

राज्यात सध्या ५५ शासकीय आणि ४२ खाजगी अशा एकूण ९७ प्रयोगशाळा करोना निदानासाठी कार्यरत आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ६ लाख ५७ हजार ७३९ नमुन्यांपैकी १ लाख ७ हजार ९५८ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ५ लाख ८७ हजार ५९६ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात १५३५ संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये ७७ हजार १८९ खाटा उपलब्ध असून सध्या २९ हजार ६४१ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

ठाणे- ८० (मुंबई ६९, ठाणे ४, उल्हासनगर ५, पालघर १, वसई-विरार १), पुणे- १४ (पुणे ११, सोलापूर ३), नाशिक-१४ (नाशिक ३,जळगाव ११), कोल्हापूर-१ (रत्नागिरी १), औरंगाबाद-७ (औरंगाबाद ७), लातूर -२ (उस्मानाबाद २), अकोला-२ (अकोला २).

आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ८१ पुरुष तर ३९ महिला आहेत. आज नोंद झालेल्या १२० मृत्यूपैकी ६०वर्षे किंवा त्यावरील ६६ रुग्ण आहेत तर ४० रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर १४ जण ४० वर्षांखालील आहे. या १२० रुग्णांपैकी ८० जणांमध्ये ( ६७ टक्के) मधुमेह, उच्चरक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता ३९५० झाली आहे.

आज नोंद झालेल्या एकूण मृत्यूपैकी ४३ मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहेत तर उर्वरित मृत्यू २ जून ते ११ जून या कालावधीतील आहेत. या कालावधीतील ७७ मृत्यूंपैकी मुंबई ५८,जळगाव – ८, नाशिक -३, ठाणे -३, उल्हासनगर -३, रत्नागिरी -१ , पुणे १ मृत्यू असे आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पतसंस्था चळवळीला बळकटी देण्याचा प्रयत्न करणार | जयंत पाटील

News Desk

विधानपरिषदेसाठी काँग्रेसचा दुसरा उमेदवार मागे घेण्यासाठी महाविकसाघाडीची बैठक

swarit

आकडा वाढला ! राज्यात आज तब्बल १३ हजारांहून अधिक नवे कोरोनाबाधित

News Desk