HW News Marathi
Covid-19

थिएटर ५० टक्के तर पर्यटन स्थळे पूर्ण बंद; वाचा काय आहे नवी नियमावली

मुंबई। महाराष्ट्रात कोरोनाबधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचं चित्र आहे. या संदर्भात प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या कालपासून महत्त्वाच्या बैठका पार पडल्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर आता राज्यात नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे.

मुंबईतील कोरोनाबधित रुग्णसंख्येने २० हजारांचा टप्पा ओलांडला असून महाराष्ट्रतही ४० हजारहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. दरम्यान, वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नाईट कर्फ्यु लावण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार आता रात्री ११ नंतर पहाटे ५ वाजेपर्यंत हा कर्फ्यु असणार आहे. सोमवार, १० जानेवारीपासून हे नियम लागू होणार आहेत. तसेस हे निर्बंध १५ फेब्रुवारीपर्यंत लागू

काय आहेत नियम?

  • स्विमिंग पूल, जिम, स्पा, पूर्णपणे बंद राहणार
  • सलून ५० टक्के आसन क्षमतेने सुरू राहील
  • उद्यान, म्युझियम, किल्ले, पर्यटन स्थळे बंद राहतील
  • शॉपिंग मॉल, मार्केट ५० टक्के आसन क्षमतेने सुरू राहतील.
  • हॉटेल, रेस्टॉरंट, दुकानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी कोरोना लसीचे दोन्ही डोस बंधनकारक
  • लसीकरण पूर्ण झालेल्या नागरिकांना सार्वजनिक बसने प्रवास करण्यास परवानगी असेल
  • लग्न समारंभासाठी ५० टक्के उपस्थितीस तर अंत्यविधी कार्यक्रमांना २० टक्के उपस्थितीमध्ये पार पाडण्यास मान्यता असेल
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

घरी परतणाऱ्या मजूर, कामगारांकडून मानवतेच्या दृष्टीने रेल्वेने तिकीट न आकारण्याची विनंती

News Desk

राज्य शासकीय कार्यालयातील उपस्थितीबाबत सुधारित आदेश जारी

News Desk

तिसऱ्या लाटेसाठी मुंबई सज्ज, महागड्या यंत्रणा उभ्या राहतील, महापौरांची माहिती

News Desk