HW News Marathi
Covid-19

मुंबईत सलग तिसऱ्या दिवशी २० हजारापेक्षा अधिक कोरोना रुग्णांची नोंद

मुंबई | राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहेत. राज्यात सलग तिसऱ्या दिवशी कोरोना रुग्णांची संख्या २० हजारहून अधिक रुग्णांची  नोंद झाली आहे. मुंबई आज (८ जानेवारी) २० हजार ३१८ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. देशात महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक आहेत. तर ५ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असून १ हजार २५७ रुग्णांना रुग्णालयात दाखल केले आहे. तर मुंबईत रिकव्हरी रेट ८६ टक्यांवर गेला आहे. 

मुंबईतील सक्रिय रुग्णांची संख्या १,०६,०३७ इतकी झाली आहे. मुंबईच्या रुग्णालयांमधील एकूण खाटांपैकी २१ टक्के खाटा सध्या भरल्या आहेत. राज्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करत आहे. मुंबईत सलग कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहा मुख्यमंत्री राज्य सरकार नवे निर्बंध लागू निर्णय घेणार असल्याची माहिती टोपेंनी आज दिला आहे. 

राज्यात निवासी डॉक्टर आणि पोलिसांनी कोरोनाची लागण झाली आहे. मुंबईत जवळपास ९३ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. पोलीस २४ तासात कामावर असतात, आतापर्यंत ९ हजार ६५७ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. 

https://twitter.com/ANI/status/1479806859754176513?s=२०

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शासकीय कर्मचाऱ्यांचे एप्रिल महिन्याचे वेतन एकाच टप्प्यात

News Desk

देशात गेल्या २४ तासांत कोरोना रुग्णांच्या संख्येत विक्रमी वाढ

News Desk

राज्यात आज ६,५५५ नवे रुग्ण, १५१ जणांचा मृत्यू 

News Desk