HW News Marathi
Covid-19

चिंतादायक! मुंबईत आज तब्बल ३ हजार ६७१ नवे कोरोना रुग्ण

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून मुंबईत कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहेत. नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर देशासह राज्यात नवे निर्बंध लावले आहेत. मुंबईत आजपासून (३० डिसेंबर) ते ७ जानेवारीपर्यंत जमाव बंदी लागू करण्यात आली आहे. हे सर्व सुरू असतानाच आज मुंबईत कोरोनाबाधिकांची संख्या ३ हजार ६७१ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर आज एकाचाही मृत्यू झाला नाही, अशी माहिती राज्यातील आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेतून त्यांनी माहिती दिली आहे. 

दरम्यान, मुंबईत कोरोना रुग्णांची आकडेवाडी वाढत चालेली आहे. सध्या मुंबईत ११ हजार ३६० अॅक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत. तर राज्यात आतापर्यंत ७ लाख ४९ हजार १५९ रुग्ण बरे झाले आहेत. तर कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांचा दर ९६ टक्क्यांवर गेला आहेत. मुंबई शहरातील कोरोना रुग्णांची संख्या दुप्पटी दर ५०५ पर्यंत पोहोचला आहे. मुंबई पालिकेने यासंदर्भातील माहिती ट्वीट करून दिली आहे.

https://twitter.com/ANI/status/1476542515591344128?s=२०

नवीन वर्षाचे स्वागत घरात करा – बीएमसी

देशात कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉनचा धोका वाढत चाला आहे. देशात तिसरी लाट ही ओमायक्रॉनची असू शकते, अशी भीती आरोग्यमंत्र्यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज कोविड टास्क फोर्ससोबत तातडीची बैठक बोलवण्यात आली होती. सध्या नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनवर चाप बसवण्यासाठी रेस्टॉरंट, हॉटेल, बार, पब, रिसॉर्ट, क्लब यासारख्या आजपासून ते ७ जानेवारीपर्यंत जमावबंदी लागू केली असून यंदाचे नवीन वर्ष हे घरातच साजरा करण्याचे आवाहन पालिकेच्यावतीने केले जात आहे. 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

माध्यमांची मुस्कटदाबी आणि अभिव्यक्तीची गळचेपी थांबवा !

News Desk

देशात २४ तासांत तब्बल ८१,४४६ नवे रुग्ण, परिस्थिती चिंताजनक!

News Desk

निलेश लंकेंचे कोव्हिड सेंटर आदर्श, भाजप आमदार श्वेता महालेंनी केलं कौतुक

News Desk