HW News Marathi
Covid-19

राज्यातील १० मंत्री अन् २० आमदारांना कोरोनाची लागण; उपमुख्यमंत्र्यांची माहिती

मुंबई | राज्यात गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. आणि आता कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉनचा धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात कडक निर्बंध लावले आहेत. नुकतेच राज्यात विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन पार पडले आहे. राज्यात १० मंत्री आणि २० आमदारांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत राहिली, तर सरकार कठोर निर्बंध लावू शकते, असे स्पष्ट संकेत पवारांनी आज (१ जानेवारी) कोरोगाव-भीमा जयस्तंभाला अभिवादन केल्यानंतर प्रसार माध्यमांशी म्हणाले. 

अजित पवार म्हणाले, “ओमायक्रॉन हा वेगाने पसरत असून अमेरिका फ्रान्स, इंग्लंडमध्ये रोज लाखो रुग्णांची नोंद होत आहे. मुख्यमंत्री टास्क फोर्सची बैठक झाली असून यात दररोज कोरोना आकड्यावर लक्ष ठेवले जात आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढतेय ते बघून निर्णय घ्यावा लागेल.  याआधी आपण कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आपल्याला मोठी किंमत  मोजावी लागली आहे. सर्वांचा जीव महत्त्वाचा आणि यासाठी सरकार प्रयत्न करत असून आता राज्य सरकार कडक नियमासाठी लावण्यास भाग पाडू नका, सर्वांनी सहकार्य करावे, अशी विनंती त्यांनी राज्यातील जनतेला केली आहे.

https://twitter.com/ANI/status/1477144870636511233?s=२०

या नेत्यांना झाली कोरोनाची लागण

  • महसूलमंत्री बाळासाहेब थोरात
  • शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड
  • आदिवासी मंत्री के. सी. पाडवी
  • ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे
  • महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर
  • खासदार सुप्रिया सुळे
  • आमदार सागर मेघे
  • आमदार राधाकृष्ण विखे पाटील
  • आमदार शेखर निकम
  • आमदार इंद्रनील नाईक
  • आमदार चंद्रकांत पाटील (मुक्ताईनगर)
  • आमदार माधुरी मिसाळ
  • माजी मंत्री दिपक सावंत
  • माजी मंत्री हर्षवर्धन पाटील

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

केंद्राच्या भरड धान्य योजनेअंतर्गत महाराष्ट्रात मका व ज्वारी खरेदीचा निर्णय

News Desk

सोनिया गांधींनी २२ मे रोजी बोलावली सर्व विरोधी पक्षांची बैठक

News Desk

जरा लांबून बोल ना… अजित पवार मनसे नगरसेवकावर का भडकले?

News Desk