HW News Marathi
Covid-19

…तर मुंबईत लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा लागेल! – अस्लम शेख

मुंबई | “मुंबई कोरोना रुग्ण संख्येत वाढ राहिल्यास काही दिवसांसाठी लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा लागेल. सध्या तशी परिस्थिती नाही, पण उद्धवल्यास लॉकडाऊन लागणार,” असे स्पष्ट इशारा मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी एएनआयशी बोलताना त्यांनी दिले आहेत. बंद केलेल कोविड सेंटर सुरू करणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. राज्यातील दररोज येणाऱ्या कोरोना रुग्णांच्या संख्येवर लक्ष ठेवू आहेत.

दरम्यान,  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक झाल्याची माहिती शेख यांनी दिली आहे. मुंबईची लोकसंख्या जास्त आहे असून गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णांची संख्या सुद्धा वेगाने वाढत आहे. येत्या काही दिवसात कोरोना रुग्णांची संख्या सतत वाढत राहिली तर मग काही दिवसांसाठी लॉकडाऊन करण्याचा निर्णय घ्यावा लागेल, असे संकते शेख यांनी एएनआयशी बोलताना दिले आहेत. 

 १० मंत्री अन् २० आमदारांना कोरोनाची लागण – पवार

 वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या आणि नवी वर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्यात कडक निर्बंध लावले आहेत. नुकतेच राज्यात विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन पार पडले आहे. राज्यात १० मंत्री आणि २० आमदारांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत राहिली, तर सरकार कठोर निर्बंध लावू शकते, असे स्पष्ट संकेत पवारांनी आज (१ जानेवारी) कोरोगाव-भीमा जयस्तंभाला अभिवादन केल्यानंतर प्रसार माध्यमांशी म्हणाले.

कडक नियम लावण्यास भाग पाडू नका – पवार

अजित पवार म्हणाले, “ओमायक्रॉन हा वेगाने पसरत असून अमेरिका फ्रान्स, इंग्लंडमध्ये रोज लाखो रुग्णांची नोंद होत आहे. मुख्यमंत्री टास्क फोर्सची बैठक झाली असून यात दररोज कोरोना आकड्यावर लक्ष ठेवले जात आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढतेय ते बघून निर्णय घ्यावा लागेल. याआधी आपण कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आपल्याला मोठी किंमत मोजावी लागली आहे. सर्वांचा जीव महत्त्वाचा आणि यासाठी सरकार प्रयत्न करत असून आता राज्य सरकार कडक नियमसाठी लावण्यास भाग पाडू नका, सर्वांनी सहकार्य करावे, अशी विनंती त्यांनी राज्यातील जनतेला केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अमेरिकेकडून व्हेंटिलेटर्स दान नाही, तर भारताला मोजावी लागणार ‘एवढी’ रक्कम

News Desk

मुख्यमंत्र्यांचा प्रशासनावर कोणताही वचक नाही, ते अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यातच व्यस्त !

News Desk

शरद पवारांनी घेतला पुढाकार ! ऑक्सिजन टंचाईची समस्या सोडवण्यासाठी ‘या’ सूचना

News Desk