HW News Marathi
Covid-19

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना कोरोनाची लागण

मुंबई |  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त समोर येत आहे. पवार यांनी स्वतः आज (२४ जानेवारी) ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. “माझी कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार माझ्यावर उपचार सुरू आहेत. काळजी करण्याचे कोणतेही कारण नाही. मात्र, माझ्या संपर्कात आलेल्यांनी कोरोनाची चाचणी करावी”, असं ट्विट शरद पवार यांनी केलं आहे.

शरद पवारांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळाल्यानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना फोन करून त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. देशाचे उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू देखील कोरोनाची लागण झाली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी राज्यात अनेक बड्या नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यात पंकजा मुंडे, सुप्रिया सुळे, रोहित पवार, राधाकृष्ण विखे पाटील, हर्षवर्धन पाटील, दिलीप वळसे पाटील अशा अनेकांचा समावेश आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सायबर गुन्हे दाखल करण्यात महाराष्ट्रात बीड अव्वल !

News Desk

ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना कोरोनाची लागण

News Desk

मी परळीसाठी पाहिलेले स्वप्न पूर्ण करणार !

News Desk