HW News Marathi
Covid-19

ओमिक्रॉनपासून बचावासाठी वैद्यकीय सुविधा सुसज्ज ठेवा! – डॉ. नितीन राऊत

नागपूर । ओमायक्रॉन संक्रमितांची वाढती रुग्णसंख्या व कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेपासून बचाव करण्यासाठी ऑक्सिजन खाटा, आयसीयू कक्ष, बालकांसाठी स्वतंत्र वार्ड, ऑक्सिजनची उपलब्धता तसेच अनुषंगिक सर्व वैद्यकीय सुविधा सुसज्ज ठेवाव्यात, असे निर्देश पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी काल (५ जानेवारी) प्रशासनाला दिले.

जिल्ह्यात कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता पालकमंत्र्यांनी काल अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स), शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयास (मेयो) भेट देऊन कोविड वार्ड, खाटांची संख्या, ऑक्सिजन प्लाँट, मनुष्यबळ आदी बाबींची पाहणी केली. जिल्हाधिकारी आर. विमला, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी., एम्सच्या संचालक मेजर जनरल डॉ. विभा दत्ता, मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता, मेयोच्या अधिष्ठाता डॉ. भावना सोनवणे यांच्यासह जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पातूरकर यावेळी उपस्थित होते.

या पाहणी दौऱ्यात पालकमंत्र्यांनी एम्स येथील कोविड वार्ड, ऑक्सिजन खाटांची संख्या, कोविड चाचणी प्रयोगशाळेची पाहणी केली. ओमायक्रॉनचे वाढते संक्रमण व कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता एम्स प्रशासनाने डॉक्टरांची रिक्त पदे तातडीने भरण्याची कार्यवाही करण्याचे आदेश त्यांनी दिले. सध्या याठिकाणी डॉक्टरांच्या एकूण 50 पदांपैकी 43 पदे भरलेली आहेत तर 7 पदे रिक्त आहेत. ओमायक्रॉन बाधितांसाठी व संशयित कोविड बाधितांसाठी 100 खाटांचे स्वतंत्र कोविड वार्ड उभारण्यात आले असून 40 आयसीयू खाटा, 25 व्हेंटिलेटर, चाचणी प्रयोगशाळा आदी सुविधा सुसज्ज ठेवण्यात आल्या आहेत. कोविड बाधितांसाठी 160 खाटांचे वार्ड सध्या कार्यरत असून 340 ऑक्सिजनयुक्त खाटांचे स्वतंत्र वार्ड चवथ्या माळ्यावर तयार करण्यात आले आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाकडून वैद्यकीय, नर्सिंग कर्मचारी उपलब्ध करुन दिले जाणार आहे. कोविडेतर रुग्णांसाठीही एम्समध्ये स्वतंत्र सुविधा करण्यात आली आहे. एम्समध्ये 400 सिलेंडची क्षमता असेलेले चार पीएसए प्लाँट निर्माण होत असून याव्दारे 30 किलोग्रॅमचे 458 जम्बो सिलेंडर ऑक्सिजनची उपलब्धता होईल, अशी माहिती डॉ. दत्ता यांनी दिली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“आधी कुंभमेळ्याची चूक, नंतर चारधाम यात्रा…”, उच्च न्यायालयानं उत्तराखंड सरकारला खडसावलं!

News Desk

जगभरात कोरोनाबाधितांची संख्या ७८ लाखांहून अधिक, तर अमेरिकेत मृतांची संख्या एक लाखांवर

News Desk

पुण्यात तब्बल ५० कंटेंटमेंट झोन्स वाढले, पालकमंत्र्यांनी केली अधिकाऱ्यांची खरडपट्टी

News Desk