HW News Marathi
Covid-19

दहा दिवसांत ठाकरे सरकारचा कोविड सेंटर घोटाळा बाहेर काढणार; किरीट सोमय्यांचा दावा

मुंबई | राज्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे आता पुन्हा एकदा कोविड सेंटर सुरू करण्याची आवश्यकता भासत आहे. मात्र, कोविड सेंटरच्या मुद्यावरून भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. कोविड सेंटर हे ठाकरे सरकारसाठी कमाईचे साधन आहे, असा गंभीर आरोप करत येत्या दहा दिवसांत ठाकरे सरकारचा हा कोविड सेंटर घोटाळा उघडकीस आणणार, असा दावा यावेळी सोमय्यांनी केला आहे.

सोमय्या म्हणाले, मुंबईत कोरोनाबाधित रुग्णसंख्येचा आकडा जरी वाढत असला तरी कोविड सेंटर्स रिकामे पडले आहेत. बीकेसीमध्ये २,४०० बेड्सपैकी ८०० बेड्सवर रुग्ण दाखल झाले आहेत. तर दहिसरमध्ये ७५० बेड्स आहेत. मात्र, अजून एक पण रुग्ण दाखल नाही. गोरेगावच्या नेस्कोमध्ये २ हजार बेड्सपैकी ९०० रुग्णांनी बेड्स भरले आहेत. यावरून ९८ टक्के रुग्ण तर आपल्या घरीच राहून किंवा नर्सिंग होममध्ये उपचार घेत आहेत, असे स्पष्ट होते. तर ज्यांचं लसीकरण झालं आहे, त्यातील ९९.९९ लोक हे सुरक्षित आहेत, अशी माहिती सोमय्यांनी दिली.

सरकार लोकांना घाबरवण्याचं काम करतंय

पुढे ते म्हणाले, महाविकास आघाडी सरकारमधील नेते आणि त्यांच्यासोबत काही आयएएस अधिकारी हे जाणूनबुजून लोकांना घाबरवण्याचे काम करत आहेत. कारण कोविड सेंटर हे त्यांच्यासाठी कमाईचं साधन आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. त्याचबरोबर येत्या दहा दिवसात ठाकरे सरकारचा कोविड सेंटर घोटाळा मी जनतेसमोर आणणार असल्याचंही ते म्हणाले. तसेच या सगळ्या घोटाळ्यांचे कागदपत्र मी जनतेला दाखवणार असंही त्यांनी यावेळी सांगितलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची पत्नी मिलेनिया ट्रम्प यांना कोरोनाची लागण 

News Desk

प्रताप सरनाईकांच्या पत्रावर चंद्रकांत पाटील म्हणतात, आम्ही हेच सांगत होतो !

News Desk

“८० हजार फेक अकाऊंट प्रकरणावर आता भाजप नेत्यांच्या तोंडाला पट्टी का ?”

News Desk