HW News Marathi
Covid-19

दिलासादायक! राज्यात आज एकही ओमायक्रॉन रुग्णाची नोंद नाही

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोना आणि ओमायक्रॉन बाधितांची संख्या वाढत असल्याचं चित्र आहे. राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असून कोरोनाचा उद्रेक होताना पाहायला मिळत आहे. आज (१८ जानेवारी) दिवसभरात राज्यात ३९,२०७ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर ५३ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे राज्यात आज एकही ओमायक्रॉन बाधित रुग्ण आढळलेला नाही.

राज्यात काल (१७ जानेवारी) कोरोनाच्या ३१ हजार १११ नव्या रुग्णांची नोंद झाली होती. तर २४ जणांचा मृत्यू झाला होता. तसेच काल दिवसभरात २९, ०९२ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. तर आज दिवसभरात राज्यात ३९ हजार २०७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून ५३ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

दरम्यान, आज दिवसभरात ३८ हजार ८२४ रुग्ण कोरोनातून मुक्त होऊन घरी परतले आहेत. त्याचबरोबर आतापर्यंत राज्यात ६८ लाख ६८ हजार ८१६ रुग्ण कोरोनातून मुक्त झाले आहेत. याशिवाय, महाराष्ट्राचा रिकव्हरी रेट ९४.३२ टक्क्यांवर पोहोचला आहे. तर, राज्यातील मृत्यूदर १.९४ वर पोहोचला आहे. तर राज्यात आज एकही ओमायक्रॉनच्या रुग्णांची नोंद झालेली नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबई महापालिकेचे सहायक आयुक्त अशोक खैरनार यांचा कोरोनामुळे मृत्यू

News Desk

महाराष्ट्रात आज ३००७ नवे कोरोना रुग्ण आढळले

News Desk

अमेरिकेतील भारतीयांना धक्का ! डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘H1- B’ संदर्भात घेतला ‘हा’ मोठा निर्णय

News Desk