HW News Marathi
Covid-19

एकट्या धारावीत कोरोनाबाधितांचा आकडा ४९६ वर

मुंबई | देशातील कोरोनाबाधितांचा आकडा तासागणिक वाढत आहे. देशाच्या आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहराला कोरोनाची सर्वाधिक झळ बसली आहे. मुंबई, पुण्यासारख्या दाटीवाटीचे परिसर अधिक असलेल्या शहरांमध्ये कोरोनाबाधितांचा वाढता आकडा हे प्रशासनापुढचे सर्वात मोठे आव्हान आहे. त्यातच जगातील सर्वात मोठी झोपडपट्टी मानल्या जाणाऱ्या मुंबईतील धारावी झोपडपट्टीमध्ये देखील कोरोनाबाधितांचा आकडा झपाट्याने वाढत चालला आहे. धारावीत केवळ गेल्या ४८ तासांमध्ये तब्बल १२७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. कालच्या (३ मे) एका दिवसात धारावीत तब्बल ८९ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे धारावीतील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा ४९६ झाला आहे.

धारावीमध्ये आतापर्यंत एकूण १८ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. मात्र, गेल्या दोन दिवसांत धारावीत कोरोनामुळे एकही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही, केवळ ही एक दिलासादायक बाब आहे. दाटीवाटीच्या परिसरांमध्ये कोरोनाचा धोका अधिक आहे. सोशल डिस्टंसिंगचा नियम अशा परिसरांमध्ये पाळला जाऊ शकत नाही. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग अशा दाटीवाटीच्या परिसरांमध्ये सर्वाधिक वाढतो. धारावी हे सध्या त्यांपैकीच एक उदाहरण आहे. त्यामुळे मुंबईत धारावी हे आता कोरोनाचे केंद्र बनले आहे. त्यामुळे, मुंबई महानगरपालिकेपुढे इतका कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आणणे हे सर्वात मोठे आव्हान आहे. दरम्यान, धारावीत आतापर्यंत ७९ हजार लोकांची तपासणी करण्यात आली आहे. तर २, ०५० जणांना धारावी पालिका शाळा, राजीव गांधी क्रीडा संकुलअशा ठिकाणी ठेवण्यात आले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देशात कोरोना रूग्ण संख्या घटली!

News Desk

हा अजित पवारांचा दांभिकपणा…दखल घ्या, कुचेष्टा करू नका ! चंद्रकांत पाटील संतापले

News Desk

राज्यात आज ८ हजारांहून अधिक नव्या कोरोनाबाधितांची नोंद

News Desk